Tuesday Upay: हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या देवाच्या नावावर असतो. जसं, सोमवारी शंकर देव, बुधवारी गणपती बाप्पा, गुरुवारी विष्णू देव, शुक्रवारी लक्ष्मी, शनिवारी शनि देवाची पूजा केली जाते. त्याच प्रमाणे, मंगळवार (Tuesday) हा संकटमोचन श्री हनुमानाला (Hanuman) समर्पित आहे. या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने आणि काही उपाय केल्याने जीवनातील समस्या दूर होतात.
मंगळवार हा दिवस हनुमानाच्या पूजेसाठी खास मानला जातो. ज्यांना त्यांच्या जीवनात बऱ्याच काळापासून अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो, अशा लोकांनी मंगळवारी काही खास उपाय केले पाहिजे. मंगळवारी केलेल्या उपवासाने देव प्रसन्न होतो आणि जीवनातील सर्व दुःख, वेदना आणि संकटं दूर करतो. ज्योतिषशास्त्रातही मंगळवार हा दिवस पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी काही खास उपायांनी तुम्ही हनुमानजींना प्रसन्न करू शकता. जाणून घेऊया मंगळवारशी संबंधित उपायांबद्दल.
मंगळवारी करा हे 6 उपाय
1. मंगळवारी सकाळी स्नान करून जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन देवासमोर तुपाचा दिवा लावावा. तसेच हनुमानजींना हार घाला आणि लाडू अर्पण करा. यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे. हा उपाय केल्याने बजरंगबली प्रसन्न होतो आणि मार्गात येणारे सर्व अडथळे लवकरच दूर होतात. असं केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
2. मंगळवार किंवा शनिवारी तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या दाराला वरती मध्यभागी एका धाग्यात गुंफलेल्या चार मिरच्या आणि एक लिंबू लटकवा. असं मानलं जातं की, यामुळे सर्व प्रकारच्या वाईट नजरा दूर होतात.
3. या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन एक नारळ घेऊन आपल्या डोक्याभोवती 7 वेळा फिरवा आणि नंतर तो नारळ हनुमानासमोर फोडा. असं केल्याने घरातील सर्व समस्या हळूहळू दूर होतात.
4. आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी मंगळवारी माकडांना गूळ, हरभरा, शेंगदाणे किंवा केळी खाऊ घाला, जर या गोष्टी माकडांना खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही या वस्तू एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करू शकता. 11 मंगळवार हा उपाय केल्यास आर्थिक संकटं दूर होतात.
5. मंगळवारी हनुमानजींना बुंदीचे लाडू अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
6. मंगळवारी बजरंगबलीला 11 पिंपळाची पानं अर्पण करा. या दरम्यान लक्षात ठेवा की एकही पान तुटू नये. या पानांची माळ बनवून हनुमानजींना अर्पण करा, यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev: नववर्ष 2024 च्या 'या' महिन्यापर्यंत 4 राशींना सुखाचे दिवस; शनिदेवाची राहणार कृपा