Trigrahi Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 29 मार्च हा दिवस खूप खास असणार आहे, या दिवशी अनेक लोकांच्या जीवनात मोठे बदल घडून येणार आहेत. सुमारे अडीच वर्षानंतर, परिणाम देणारा आणि न्याय देणारा शनि आपली राशी बदलणार आहे. त्यासोबतच शुक्र, बुध, सूर्य आणि राहू एक महासंयोग तयार करत आहेत. ज्याचा परिणाम विविध राशींच्या लोकांवर पाहायला मिळेल, अशात कोणत्या 3 राशींचे भाग्य चमकणार? जाणून घ्या..
शनि, शुक्र आणि राहूंचा त्रिग्रही योग
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडून गुरूच्या राशीत प्रवेश करेल. मीन राशीत शनीचे संक्रमण काही राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक बदल घडवून आणू शकते. शुक्र, बुध, सूर्य आणि राहू हे मीन राशीत आधीच उपस्थित आहेत आणि एक संयोग तयार करत आहेत. 29 मार्च रोजी जेव्हा शनिचे भ्रमण होईल तेव्हा शुक्र आणि राहूसह तिन्ही ग्रह त्रिग्रही योग तयार करतील. मूळ त्रिकोण कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत स्थिरावल्यावर शुक्र आणि राहूसोबत शनि त्रिग्रही योग तयार करेल. जाणून घेऊया कोणत्या 3 राशींचे जीवन यामुळे बदलू शकते?
ग्रहांच्या महासंयोगामुळे कोणत्या 3 राशींचे भाग्य चमकणार?
ज्योतिषशास्त्रानुसार, 29 मार्च हा दिवस खूप खास असेल, कारण न्यायाधीश शनिदेव गुरुच्या राशीत प्रवेश करतील आणि या राशीमध्ये आधीपासून असलेल्या ग्रहांशी संयोग घडवतील. अशा परिस्थितीत कोणत्या 3 राशींचे भाग्य चमकू शकते?
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी काळ फायदेशीर राहील. त्रिग्रही योगामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतील. अनेक दिवसांपासून नियोजित असलेली कामे लवकरच पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक परिस्थितीत बदल होईल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन योजना उपयोगी पडतील.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. मिथुन राशीसाठी त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकतो. मान-सन्मानात वाढ होईल. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. पगारात वाढ होऊ शकते. काम वाढवण्यासाठी नवीन योजना कराल आणि त्यात यशही मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. त्रिग्रही योग जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. संपत्तीत वाढ होण्याची विशेष शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. व्यवसाय वाढविण्याचा विचार कराल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगला जाईल.
हेही वाचा>>
Lucky Zodiac Sign: 23 मार्च तारीख अद्भूत! 'या' 5 राशी राजासारखं जीवन जगणार, वाईट काळ संपेल, बक्कळ पैसा मिळेल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)