Trigrahi Yog 2024 : ज्योतिषशास्त्रात आजचा दिवस खास आहे. याचं कारण म्हणजे आजच्या दिवशी मेष (Aries) राशीत त्रिग्रही योग (Trigrahi Yog) तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रात त्रिग्रही योग अत्यंत शुभ मानला जातो. या दरम्यान मेष राशीत प्रमुख ग्रहांची मोठी हालचाल पाहायला मिळेल. आज शुक्र मेष राशीत आल्याने त्रिग्रही योग तयार झाला आहे. गुरू गेल्या एक वर्षापासून मेष राशीत आहे. सूर्य देखील 13 एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करतो. जाणून घ्या मेष राशीतील तीन मोठ्या ग्रहांच्या संयोगाने कोणत्या राशींना फायदा होणार आहे.


मेष रास (Aries Horoscope)


त्रिग्रही योग तयार झाल्याने तुम्हाला अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. हा आठवडा तुमच्यासाठी सर्जनशील असेल. तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वास वाटेल. तुम्हाला तुमच्या कामात आनंद वाटेल. तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या काळात तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकता. 


कर्क रास (Cancer Horoscope


त्रिग्रही योग तयार झाल्याने व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येतील. तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्ही मीडिया किंवा चित्रपट क्षेत्राशी निगडीत असाल तर तुमच्यासाठी नवीन मार्ग खुले होतील.


तूळ रास (Libra Horoscope Today)


तूळ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाल्याने शिक्षण, करिअर, संपत्ती, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनासाठी हा उत्तम काळ आहे. पती-पत्नीच्या नात्यात प्रेम वाढेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची प्रत्येक पावलावर साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे, ते प्रगतीच्या मार्गावर पुढे जातील. प्रेम संबंध चांगले राहतील.


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे हा काळ फलदायी राहील. या काळात तुम्ही स्वतःसाठी वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचाही विचार करू शकता. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रेमसंबंधातही तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक सदस्य तुमच्या नात्याला मान्यता देऊ शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Dev : 'या' 3 राशींवर शनीची साडेसाती सुरु, तर 2 राशींवर ढैय्या; पुढच्या काळात कोणत्या राशींवर कधी असणार शनीची साडेसाती? जाणून घ्या