Tilak Benefits : हिंदू धर्ममान्यतेनुसार, कपाळावर टिळा लावण्याला फार महत्त्व आहे. खरंतर, कपाळावर टिळा लावण्यासंबंधित अनेक मान्यता आहेत. असं म्हणतात की, टिळा लावल्याने आयुष्यात फक्त सकारात्मकताच येत नाही तर कुंडलीत उपस्थित असलेले ग्रह देखील शांत होतात.


खरंतर, सामान्य दिवशी किंवा काही विशेष दिनानिमित्त, सणासुदीला कपाळावर विविध प्रकारचा टिळा लावण्यात येतो. यामध्ये चंदनाच्या टिळ्याला सर्वात जास्त लाभदायक म्हटलं जाते. एकूणच कपाळाला टिळा लावणं का शुभकारक मानलं जातं या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


कपाळावर टिळा लावण्याचं महत्त्व 


ज्योतिष शास्त्रानुसार, कपाळावर टिळा लावणं हे एका अर्थाने भगवान विष्णुचं तेज मानलं जातं. कपाळाला टिळा लावल्यामे पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य फल मिळते अशी मान्यता आहे. तसेच, टिळ्याला त्रिदेव म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं. विविध समुदायात टिळा लावण्याचं वेगवेगळं महत्त्व आहे. 


शास्त्रानुसार, टिळा लावल्याने ग्रहांची स्थिती सुधारते आणि यामुळे तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतात असं म्हणतात. तसेच, दिनाच्या अनुषंगाने टिळा लावल्याचे त्याचे शुभ परिणाम मिळतात. 



  • मान्यतेनुसार, सोमवारच्या दिवशी पांढऱ्या चंदनाचा टिळा लावल्याने मन शांत राहते असं म्हणतात. 

  • मंगळवारच्या दिवशी चमेलीच्या तेलात शेंदूर एकत्र करून लावणं शुभ मानलं जातं. 

  • बुधवारच्या दिवशी कोरडे शेंदूर लावल्याने देवाची सदैव कृपा राहते. 

  • गुरुवारच्या दिवशी पिवळा चंदन किंवा हळद लावल्याने घरात सुख-शांती, समृद्धी नांदते. 

  • शुक्रवारच्या दिवशी लाल चंदन किंवा कुंकूचा टिळा लावल्याने घरात सुख-शांती नांदेत. 

  • शनिवारच्या दिवशी राखेचा टिळा लावल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. 

  • रविवारच्या दिवशी लाल रंगाचा टिळा लावल्याने व्यक्तीच्या मान-सन्मानात वाढ होते आणि धनप्राप्ती होते असं म्हणतात. 

  • शास्त्रानुसार, चंदनाचा टिळा लावल्याने घर अन्न-धान्याने परिपूर्ण राहते आणि सौभाग्य टिकून राहते असं म्हणतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :


Astro Tips : घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी का देतात? वास्तूशास्त्रानुसार थेट ग्रहांशी आहे याचा संबंध; जाणून घ्या