Astro Tips : तुम्ही भारतातल्या कोणत्याही घरात जा त्या ठिकाणी पाहुण्यांना देवासमान मानलं जातं. पाहुणे घरात येताच आपण त्यांचं स्वागत करतो. त्यांना काय हवं नको ते विचारतो. पण, त्याआधी आपण त्यांना पाण्यासाठी विचारतो. खरंतर, वास्तूशास्त्रानुसार पाहुण्यांना घरी येताच पाणी (Water) विचारण्याच्या पद्धतीबाबत सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे. जर, या नियमांचं उल्लंघन केलं तर व्यक्तीला नकारात्मक ऊर्जेचा देखील सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पाहुणे घरी आल्यानंतर त्यांना सर्वात आधी पाण्याबाबत विचारावं की विचारू नये आणि याचा घरातील सदस्यांवर काय प्रभाव पडतो या संदर्भात सविस्तरपणे जाणून घेऊयात. 


घरी आलेला पाहुणा पाणी न पिताच गेला तर...


वास्तूशास्त्रानुसर, जर घरात आलेला पाहुणा पाणी न पिताच घराबाहेर निघून जात असेल तर यामुळे तुमच्या कुंडलीतील नवग्रहांच्या स्थितीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. खरंतर, घरी आलेल्या पाहुण्याने पाणी न पिताच तो घराबाहेर गेला तर यामुळे तुमच्या घरातील सदस्यांच्या कुंडलीतील नवग्रहांची स्थिती कमजोर होण्याची शक्यता असते. तसेच, यामुळे राहु ग्रहाच्या नकारात्मक प्रभावाचा देखील तुम्हाला सामना करावा लागू शकतो. 


जर तुमच्या कुंडलीतील ग्रह कमजोर झाले तर व्यक्तीला मानसिक तणावाचा देखील सामना करावा लागू शकतो. याशिवाय आपल्या मनात आपला जोडीदार, मित्र परिवाराबाबत देखील सतत संशय वाटू लागतो. त्याचबरोबर, घरातील सदस्यांच्या तब्येतीबाबत नकारात्मक परिणामाचा देखील सामना करावा लागू शकतो. 


उरलेल्या पाण्याचं काय करावं?


घरी आलेल्या पाहुण्यांना जे आपण पाणी देतो त्यातील काही अंशी पाणी ग्लासमध्ये राहिल्यास चुकूनही हे पाणी ग्रहण करू नका. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, त्या उरलेल्या पाण्यात नकारात्मक शक्तीदेखील असू शकते. खरं सांगायचं तर, घरी येणारा पाहुणा नेहमीच सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल असे नाही तर तो नकारात्मक ऊर्जा देखील घेऊन येऊ शकतो. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्याचं जर ग्लासात पाणी शिल्लक राहिलं असेल तर ते पाणी एकतर रोपात टाकावं किंवा किचनच्या सिंकमध्ये फेकून द्यावं.  यामुळे घरातील सदस्यांवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होत नाही. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :


Angarki Sankashti Chaturthi 2024 : आज अंगारक संकष्ट चतुर्थी! बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' उपाय; मनातील इच्छा होतील पूर्ण