Shravan 2024 : आज श्रावणातील तिसरा सोमवार असून यादिवशी अनेक शुभ योग जुळून आले आहेत. आज श्रावण पौर्णिमा देखील आहे, जी नारळी पौर्णिमा किंवा राखीपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आजच्या दिवशी देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2024) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यंदा रक्षाबंधनाला तिसरा श्रावणी सोमवार आल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. या काळात काही उपाय केल्याने महादेवाची विशेष कृपा लाभेल आणि सर्व संकटं दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतील. पण तिसऱ्या श्रावणी सोमवारी नेमके कोणते उपाय करावे? जाणून घेऊया.
श्रावणी सोमवार उपाय (Shravan Somvar Remedies)
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केलं जातं. शक्य असल्यास या दिवशी उपवास धरावा. शिवलिंगाचे किंवा शंकराच्या फोटोची पूजा करावी. श्रावणी सोमवारी शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान वाहावं. महादेवाला बेलाचं पान अतिशय प्रिय आहे, त्यामुळे फक्त एक बेलाचं पान वाहिलं तरी तुम्हाला पूर्ण पूजेचं पुण्य प्राप्त होतं. या उपायाने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख-शांती नांदते.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ? (Shravan 2024 Second Shiva Muth)
श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामूठ वाहली जाते, त्याप्रमाणे शंकराला तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूगाची शिवामूठ (Moong Shiva Muth) वाहायची आहे.
यंदा श्रावणात किती सोमवार आणि कोणती शिवमूठ वाहावी?
पहिला सोमवार – 05 ऑगस्ट, पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहावी.
दुसरा सोमवार – 12 ऑगस्ट, दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ वाहावी.
तिसरा सोमवार – 19 ऑगस्ट, तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग वाहावी.
चौथा सोमवार – 26 ऑगस्ट, चौथ्या सोमवारी शिवामूठ जव वाहावी.
पाचवा सोमवार – 02 सप्टेंबर, पाचव्या सोमवारी शिवामूठ हरभरा वाहावी.
श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल, दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.
शंकराची पूजा कशी करावी?
प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शंकराच्या फोटोची पूजा करावी. शंकराचा फोटोसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी. ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकता.
शिवामूठ व्रत करण्याची पद्धत
विवाहानंतर पहिली पाच वर्षं श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्या चार/पाच सोमवारी चार/पाच प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं. विवाहानंतरची पहिली पाच वर्षं क्रमवार हे व्रत केलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :