Taurus Weekly Horoscope 8 To 14 April 2024 : राशीभविष्यानुसार, नवीन आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीचं उत्पन्न वाढेल, आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिक आपल्या कामात फार व्यस्त असतील. तुमचं आरोग्यही चांगलं राहील. एकूणच वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Life Horoscope)


या आठवड्यात तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा विशेष आदर करा आणि त्यांची काळजी घ्या. वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींमध्ये जोडीदाराला साथ द्या, यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास टिकून राहील. संभाषणातून नात्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराशी वाद घालणं टाळा.


वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)


हा आठवडा तुम्हाला तुमची कामगिरी सुधारण्यासाठी भरपूर संधी देईल. तुमचं राहिलेलं काम लवकरात लवकर आटोपून घ्या. आठवड्याचा शेवटचा दिवस नोकरीच्या मुलाखतीसाठी शुभ राहील. ज्या लोकांना नोकरी बदलायची आहे, त्यांनी त्यांचा सीव्ही, तुमचे प्रोफाईल अपडेट ठेवावे. या आठवड्यात तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. वृषभ राशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात व्यवसायात प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील.


वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)


येणारा आठवडा वृषभ राशीसाठी चांगला असणार आहे. आठवड्याचा सुरुवात प्रसन्न जाणार आहे. कामाच्या बाबतीत देखील तुम्ही नम्र असाल. पैशाची आवक वाढेल. या आवड्यात उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून तुम्हाला आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. वृषभ राशीच्या काही लोकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. आठवड्याच्या मध्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पैसे जास्त खर्च होतील. या आठवड्यात तुम्हाला कायदेशीर बाबींमुळे पैसे खर्च करावे लागतील.


वृषभ राशीचे आरोग्य  (Taurus Health Horoscope)


नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. फक्त जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. जे दिर्घकाळ आजारापासून त्रस्त आहेत त्यांनी वेळीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Nandi Bull In The Temple : भगवान शंकराचं वाहन नंदी; पण मंदिरात नंदी बैल असण्यामागचं शास्त्रीय कारण तुम्हाला माहीत आहे का?