Taurus Horoscope Today 21 June 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार (Employees) लोकांना आज नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. जे युवक कामाच्या शोधात फिरत आहेत, त्यांना मित्राच्या (Friends) मदतीने रोजगार मिळेल. राजकारणात (Politics) करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी काळ चांगला आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात (Married Life) गोडवा असेल. आज तुमचे जास्त पैसे खर्च होऊ शकतात. पैशांचा जपून वापर करा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
आज वृषभ राशीचे लोक स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखणार नाहीत. तुमच्या रागीट स्वभावामुळे लोक तुमची मदत करण्यास टाळाटाळ करतील, ज्यामुळे अनेक महत्त्वाची कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. व्यापार क्षेत्रात काही नवीन प्रयोग होतील, परंतु आज जुन्या योजनांमधून नफा मिळेल.
वृषभ राशीच्या नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कठोर परिश्रमाने लाभासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेणे देखील फायदेशीर ठरेल. कामाच्या वेळी, व्यवसायात ग्राहकांच्या पुढाकारामुळे चांगली विक्री होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. रेडिमेड कपडे आणि सुंदर आकर्षक डिझायनर कपड्यांशी संबंधित व्यवसायात हळूहळू प्रगती करत असल्याचे दिसून येईल. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसच्या कामात व्यस्त राहतील आणि वेळेवर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.
वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कुटुंबीयांबरोबर आज एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. तुमच्या मनाला शांती मिळेल. संध्याकाळचा वेळ मित्रांबरोबर घालवल्याने तुम्हाला उत्साही वाटेल. अनेक गोष्टी शेअर केल्या जातील.
आजचे तुमचे वृषभ राशीचे आरोग्य
आज तुम्हाला सांधेदुखीच्या तक्रारी जाणवतील. दिर्घकालीन आजार असल्या कारणाने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय
आजच्या दिवशी विष्णु सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरेल.
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :