Taurus Horoscope Today 17 June 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसायाला (Business) पुढे नेण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत (Job) प्रगतीच्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांशी बोलताना वाणीतील गोडवा ठेवा. आज तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. कौटुंबिक (Family) जीवनात सुख-शांती राहील. राजकारणात (Politics) यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. जे लोक घरून ऑनलाईन (Online) काम करतात त्यांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. मुले क्रीडा स्पर्धेत भाग घेतील, ज्यामध्ये ते जिंकतील.
करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी व्यावसायिक कामात वेगवान आहे. चांगला नफा मिळाल्याने तुम्हाला काम करावेसे वाटेल. तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत बसून काही नवीन नियोजन करू शकता. आयुर्वेदिक औषधांमध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगले दिवस येतील. नोकरी व्यवसायात नोकरदारांवर कामाचा ताण राहील. आज कामाच्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. लक्षपूर्वक काम करणं गरजेचं आहे.
अधिकाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
आज वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील, त्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. राजकारणात तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. अधिकारी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करतील.
आज वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कुटुंबात काही ना काही मुद्द्यावरून मतभेद किंवा वाद होऊ शकतात. कोणत्याही गोष्टीबद्दल विचारपूर्वक बोलावे. अशा गोष्टी कोणालाही सांगू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल.
वृषभ राशीचे आजचे आरोग्य
आज तुम्हाला रक्तदाबाशी संबंधित समस्या खूप वाढू शकतात. आज औषधांच्या बाबतीत निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय
आज शनिदेवाचे ध्यान करा आणि आपल्या पितरांचे नाव घेताना वाहत्या पाण्यात काळे तीळ तरंगवा.
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :