Swami Samartha Tarak Mantra : स्वामी समर्थांचा तारक मंत्र (Swami Samartha Tarak Mantra)  हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे.  'तारक' म्हणजे 'तारून नेणारा'. हा तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने, तुम्हाला सर्व संकटातून वाचवणारा मंत्र आहे. म्हणूनच त्याला तारक मंत्र म्हणतात. हा मंत्र म्हणल्याने किंवा ऐकल्याने मनातील सर्व चिंता, वेदना आणि दु:ख दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदतो.


स्वामींच्या (Swami) तारक मंत्राच्या शक्तिचं अनुभव घेतलेल्या भक्तांनी या मंत्राचं वर्णन प्रत्येक गोष्टीवर उपचार असं केलं आहे. तसेच हा मंत्र  आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता देखील घेऊन येतो. एखादी माणूस नैराश्येत असेल किंवा दु:खी असेल तर त्याचं जगणं चांगलं करण्याची ताकद तारक मंत्रात आहे.


श्री स्वामी समर्थ तारक मंत्र (Shri Swami Samartha Tarak Mantra) 


॥ श्री स्वामी समर्थ ॥


निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।


प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।


अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,


अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।


जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,


स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।


आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,


परलोकी ही ना भीती तयाला


अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।


उगाची भितोसी भय हे पळु दे,


वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।


जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,


नको घाबरू तू असे बाळ त्यांचा


अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।


खरा होई जागा श्रद्धेसहित,


कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।


आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,


नको डगमगु स्वामी देतील हात


अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।


विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,


स्वामीच या पंचामृतात।


हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,


ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Bhushan Kadu : उद्या स्वामींच्या मठात या... जीवन संपवायला निघालेल्या भूषण कडूच्या आयुष्याचा कायापालट कसा झाला?