Surya Grahan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च रोजी 2025 वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan) लागणार आहे. वर्षातील हे पहिलं सूर्यग्रहण 5 राशींसाठी फार घातक ठरणार आहे. कारण या दिवशी कर्मफळदाता शनीचं सुद्धा मीन राशीत संक्रमण होणार आहे. त्यामुळे अनेक राशींवर याचा परिणाम होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी 29 मार्चनंतर स्थिती बदलणार आहे. या दरम्यान मेष राशीच्या लोकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. त्यात कोणताही हलगर्जीपणा करुन चालणार नाही. तसेच, या काळात तुमच्या नातेसंबंधांनाही जपा. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य ग्रहणानंतरचा काळ फार कठीण असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. कारण याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. तसेच, कुटुंबातील कोणत्याही सदस्याबरोबर विनाकारण वाद घालण्याचा प्रयत्न करु नका. तुमच्यातील वाद वाढू शकतात.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना सूर्य ग्रहणानंतर सावध राहण्याची गरज आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात अधिक गांभीर्याने विचार करावा लागेल. तसेच, तुम्हाला तुमच्या बजेटवर देखील नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमची एक चूक तुम्हाला नंतर महागात पडू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांनी सूर्य ग्रहणाच्या वेळी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका. तसेच, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. विनाकारण पैसे खर्च करु नका. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी सुर्यग्रहणानंतरचा काळ फार कठीण असणार आहे. या दरम्यान तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, या काळात कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण करु नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)