Surya Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य 17 ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून संक्रमण करुन तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर वेगवेगळा होणार आहे. काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. तर, काही राशींसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या संक्रमणामुळे नात्यात तणावाचा सामना करावा लागू शकतो. विशेषत: जोडीदाराबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. तसेच, वेळोवेळी तुमचे आत्मनिरिक्षण करा. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांनी या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच, छोट्या-छोट्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कार्यात अडथळा येण्याची शक्यता आहे. तुमचे कौटुंबिक वातावरण चांगले असेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात कमतरता दिसू शकते. नवीन प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी हा काळ चांगला आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना घाईगडबड करु नका. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार संकटाचा असणार आहे. या काळात समजूतदारीने निर्णय घ्या. तुमच्या कुटुंबात काही उतार-चढाव पाहायला मिळू शकतो. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या नातेसंबंधात तणाव जाणवू शकतो. तसेच, तुमचा आत्मसन्मान कमी होण्याची शक्यता आहे. 


कन्या रास (Virgo Horoscope)


सूर्याच्या संक्रमणाचा कन्या राशीच्या लोकांवर देखील परिणाम दिसून येणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. यासाठी पैशांची गुंतवणूक करा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या