Astrology : पंचांगानुसार सूर्याचा राशी बदल 16 जुलैला झाला होता, तर त्याआधी 12 जुलैला शनीचा राशी बदल झाला होता. सूर्य देवाने 16 जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश केला, तर शनि 12 जुलै रोजी कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश केला. ज्योतिष शास्त्रानुसार हे दोन महत्त्वाचे ग्रह एकमेकांच्या सातव्या घरात बसले आहेत. या दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे आणि सप्तम भावात असल्यामुळे एक अद्भुत समसप्तक योग तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या बदलामुळे किंवा त्यांच्या हालचालीमुळे सर्व राशींवर याचा परिणाम होतो. जाणून घेऊ



मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा समसप्तक योग शुभ काळ घेऊन आला आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल. नोकरीत प्रगती होईल आणि व्यवसायात चांगला फायदा होईल. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल.


कर्क : हा समसप्तक योग कर्क राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ करेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांना नोकऱ्या मिळू शकतात.


तूळ : या राशीच्या लोकांसाठी नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. करिअर बनवण्याच्या प्रयत्नात असलेल्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. त्यांना यश मिळेल. व्यवसायात अधिक नफा मिळेल.


मीन : शनि आणि सूर्याच्या स्थितीमुळे तयार झालेला संसप्तक योग या राशीच्या लोकांसाठी शुभ मुहूर्त घेऊन आला आहे. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल, जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळेल. आणि जे नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन मिळू शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :