Surya Shukra Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट काळानंतर संक्रमण करतात आणि राशी बदलतात. काही वेळी एकाच राशीत दोन किंवा अधिक ग्रह उपस्थित असल्याने त्या ग्रहांची युती होते, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि संपूर्ण जगावर दिसून येतो. 15 जूनला मिथुन राशीत 2 ग्रहांचं मिलन होणार आहे.
धन आणि समृद्धी देणारा शुक्र (Venus) 12 जूनला मिथुन (Gemini) राशीत प्रवेश करेल आणि सूर्य (Sun) 15 जूनला मिथुन राशीत प्रवेश करेल. यानंतर 15 तारखेला शुक्र आणि सूर्याची (Shukra Surya Gochar) युती होईल, यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. तसेच, या लोकांच्या संपत्तीतही अमाप वाढ होऊ शकते. 15 जूननंतर कोणत्या राशींचं (Zodiac Signs) भाग्य उजळणार? जाणून घेऊया.
मिथुन रास (Mithun Zodiac)
शुक्र आणि सूर्याची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारेल. तसेच, जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर या काळात तुम्हाला नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळतील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रभावशाली व्यक्तींशी तुमची ओळख होईल, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होऊ शकतो. या काळात विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन छान राहील. दुसरीकडे, जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर थोडं हुशारीने काम करा, तरच तुम्हाला चांगला नफा मिळेल. भागीदारीच्या व्यवसायातच तुम्हाला फायदा होईल.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि सूर्याची जोडी अनुकूल ठरेल. कारण हा योग तुमच्या राशीच्या पाचव्या घरात घडणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुमचं जीवन सुकर होईल. तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. तसेच, यावेळी तुम्हाला प्रेमसंबंधात यश मिळेल. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकतं.
कन्या रास (Kanya Zodiac)
कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शुक्राची युती शुभ सिद्ध होऊ शकते. कारण हा योग तुमच्या संक्रमण कुंडलीच्या कर्म घरात घडणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं.तसेच, जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर या काळात तुम्हाला नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने मिळेल. तुमचं वडिलांसोबतचं नातं घट्ट होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :