Shani Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रात शनीला न्याय देवता मानलं जातं. शनि सर्व राशींना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. जेव्हा-जेव्हा शनीच्या हालचालीत बदल होतो, तेव्हा सर्व 12 राशींच्या जीवनावर त्याचा व्यापक प्रभाव दिसून येतो. काही राशींसाठी हा काळ शुभ ठरतो, तर काही राशींसाठी हा काळ अशुभ ठरतो. यातच आता जूनच्या शेवटी शनीची चाल बदलणार आहे, जुलैच्या सुरुवातीपासूनच काही राशींवर याचा मोठा प्रभाव दिसून येईल.


शनि सर्वात कमी वेगात राशी बदलतो, एकाच राशीत शनि अडीच वर्षं राहतो. शनि सध्या स्वतःच्या राशीत, म्हणजेच कुंभ राशीत आहे. याच राशीत 30 जूनला शनि वक्री (Shani Vakri 2024) होईल. शनीच्या वक्री स्थितीचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर नक्कीच होणार आहे. हा परिणाम शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकतो. परंतु, विशेषतः 3 राशींसाठी हा काळ कठीण असेल, समस्यांनी भरलेला असेल.


मेष रास (Aries)


शनि वक्री होताच मेष राशीच्या लोकांचा काळ बदललेला दिसेल. या काळात तुमच्या आयुष्यातील अडचणी वाढू शकतात. घरात कुटुंबीयांसोबत, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. जुलैपासून 3 महिने तुमचा मानसिक तणावही वाढेल. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत घ्यावी लागेल. शत्रू तुमच्यावर अधिक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. अनेक क्षेत्रात तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावं लागू शकतं. तुम्हाला अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी प्रवास करावा लागू शकतो, यात तुमचा बराच पैसा खर्च होईल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांना शनीच्या वक्री चालीमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. जास्त खर्चामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. तुमची तब्येतही बिघडू शकते. काही कारणास्तव तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकतं. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. वाढत्या आळसामुळे कोणतंही काम वेळेवर पूर्ण होणार नाही. विद्यार्थ्यांना अभ्यास करावासा वाटणार नाही.


कुंभ रास (Aquarius)


या राशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी चाल शुभ ठरणार नाही. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय पक्षात येणार नाही. या काळात कोणत्याही वादात अजिबात पडू नका, अन्यथा अडकू शकता. या काळात तुम्ही मानसिक तणावातही असू शकता. तुम्ही वाहन चालवत असाल तर जपून चालवा, कारण इजा होण्याची शक्यता आहे. या काळात अनावश्यक वाद टाळा. जोपर्यंत शनि वक्री स्थितीत राहील, तोपर्यंत कोणतंही नवीन काम सुरू करू नका. जुलैपासून 3 महिन्यांच्या काळात तुम्हाला आर्थिक चणचणही जाणवू शकते.


संकटांपासून बचावासाठी करा हे उपाय


शनीच्या वक्री चालीचा अशुभ परिणाम टाळण्यासाठी दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा. मोहरीच्या तेलाने शनिदेवाला स्नान घाला. शनि चालिसाचा पाठ अवश्य करा. याशिवाय बजरंगबलीची पूजा करावी. शनिवारी सुंदरकांड पठण करावं. तसेच रोज हनुमान चालिसा वाचा, असं केल्याने शनीचा नकारात्मक प्रभाव खूप कमी होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Vakri 2024 : अवघ्या 20 दिवसांत शनि बदलणार आपली चाल; 5 महिन्यात 'या' राशी होणार मालामाल, पैशाला पैसा टिकून राहणार