Budh Gochar In Gemini Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. ग्रहांच्या संक्रमणाचा सर्व राशींवर परिणाम होतो. 12 दिवसांनंतर बुध ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रह सध्या वृषभ राशीत (Taurus Horoscope) विराजमान आहे. त्यानंतर 14 जून रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 


ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतो. 14 जून रोजी बुध ग्रह आपल्या राशीत म्हणजेच मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. या दरम्यान तीन राशींवर (Zodiac Signs) त्याचा विशेष लाभ होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


कन्या रास (Virgo Horoscope)


ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाचं राशी परिवर्तन फार शुभ आणि लाभदायक असणार आहे. बुध ग्रह कन्या राशीच्या दहाव्या चरणात संक्रमण करणार आहे. यामुळे या राशीच्या व्यवहारात चांगलं यश मिळणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला चांगला धनलाभ होईल. तसेच, तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच, या काळात तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होऊ शकतो. 


तूळ रास (Libra Horoscope)


ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाचं संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. बुध ग्रह या राशीच्या नवव्या चरमात आहे. या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच, तुम्ही करत असलेल्या तुमच्या कामात तुम्हला चांगलं यश मिळेल. या काळात तुम्ही ठरवलेली सगळी कामं पूर्ण होतील. तसेच, मित्राच्या सहकार्याने तुमची सर्व कामे पूर्ण होतील. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाचं संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात बुध ग्रह पंचम चरणात असणार आहे. या दरम्यान, तुम्हाला संतान प्राप्ती होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार शुभदायक असणार आहे. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुमचा प्रेमविवाह या काळात होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा व्यवहार चांगला असणार आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Sury Budh Shukra Gochar 2024 : 15 मे पासून 'या' 5 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; मिथुन राशीत जुळून येतोय 'त्रिग्रही योग'