Sun Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिना खास असला तरी अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार असल्याने त्याचा काही राशींच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल. ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक नकारात्मक गोष्टी घडतील. तसं पाहायला गेलं तर येणारा प्रत्येक दिवस काहीना काहीतरी खास घेऊन येतो. मात्र 14 मार्च 2025 ही तारीख अनेकांसाठी तितकी खास नसणार आहे. या तारखेला 5 राशींच्या लोकांनी सावधानता बाळगावी असं ज्योतिषींकडून सांगण्यात येतंय.
5 राशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम
ज्योतिषशास्त्रानुसार, 14 मार्च रोजी ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशीत प्रवेशाचा 5 राशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होणार आहे. या कारणास्तव, या राशीच्या लोकांनी या काळात खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 14 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 6:58 वाजता ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे संक्रमण सर्व 12 राशींवर परिणाम करेल. काहींसाठी ते शुभ तर काहींसाठी अशुभ असेल. जेव्हा सूर्य मीन राशीत जाईल तेव्हा राहू, बुध आणि शुक्र सारखे ग्रह मीन राशीत आधीच उपस्थित असतील. यामुळे सूर्याचाही इतर ग्रहांशी संयोग होईल. सूर्याच्या प्रभावामुळे काही राशींनाही त्यांच्या आयुष्यात अडचणी येण्याची शक्यता असते. १४ एप्रिलपर्यंत सूर्य या राशीत राहणार आहे. यानंतर ते मेष राशीत प्रवेश करतील. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याचे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांच्या 10 व्या घरावर परिणाम करेल. या राशीच्या तिसऱ्या घराचा स्वामी सूर्य आहे. यामुळे मिथुन राशीच्या लोकांना सूर्याच्या संक्रमणामुळे करिअरमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुमचे वरिष्ठांशी किंवा बॉसशी मतभेद होऊ शकतात. तुम्हाला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. यामुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
कन्या
ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीमध्ये सूर्य 12 व्या घराचा स्वामी आहे, परंतु कन्या राशीच्या लोकांच्या 7 व्या घरावर या संक्रमणाचा प्रभाव पडेल. यामुळे वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. जोडीदाराशीही वाद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारीमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमची फसवणूक होऊ शकते. यामुळे तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. अनावश्यक खर्च वाढू शकतो.
धनु
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या 9व्या घराचा स्वामी सूर्य आहे. धनु राशीच्या लोकांच्या चौथ्या घरावर या संक्रमणाचा प्रभाव पडेल. यामुळे कौटुंबिक जीवनात मतभेद होऊ शकतात. तुमच्या आईला आरोग्याच्या समस्या असू शकतात. घरामध्ये मालमत्तेच्या वादाला सामोरे जावे लागू शकते. मानसिक तणावामुळे भावनिक अस्थिरता निर्माण होऊ शकते.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी सूर्य 8 व्या घराचा स्वामी आहे आणि या राशीच्या लोकांवर या संक्रमणाचा प्रभाव तिसर्या भावात राहील. यामुळे तुमचे भावंडांशी मतभेद होऊ शकतात. तुमच्या बोलण्यात कटुता असू शकते. नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. प्रवास करताना काळजी घ्या. दुखापत किंवा अपघात होण्याची शक्यता आहे.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांच्या दुसऱ्या घरावर या संक्रमणाचा परिणाम होईल. या राशीच्या सातव्या घराचा स्वामी सूर्य आहे. या संक्रमणामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. पैशाची हानी आणि अनावश्यक खर्च होऊ शकतो. बोलताना सावध राहा अन्यथा त्रास होण्याची शक्यता आहे. तुमचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. यामुळे तुम्हाला लोकांच्या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागू शकते.
हेही वाचा>>>
Shani Dev: विवाहबाह्य संबंध, घोटाळा करणाऱ्या 'या' 3 राशींच्या लोकांनो सावधान! शनिदेव करणार पर्दाफाश! आताच व्हा सतर्क, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
नसणार आहे. या तारखेला 5 राशींच्या लोकांनी सावधानता बाळगावी असं ज्योतिषींकडून सांगण्यात येतंय.