Astrology: ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या  शुभ आणि अशुभ घटनांना ग्रह जबाबदार मानले जातात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह महिन्याला राशी बदलत असतात. ग्रह बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर त्याचा परिणाम होतो.  ग्रहांविषयी बोलायचे तर ग्रहांचा स्वामी स्वामी सूर्यदेव आहे. सूर्य दर  महिन्याला आपली राशी बदलतो  (Sun Transit 2024). सूर्य राशी बदलतो त्याला  सूर्य संक्रांती म्हणतात. 13 फेब्रुवारीला सूर्य आपली राशी बदलणार आहे. सूर्य मकर राशीतील आपला प्रवास  समाप्त करून  कुंभ राशीत  प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रह  13 फेब्रुवारी ते 18  मार्च या काळात कुंभ राशीत राहणार आहे. सूर्याच्या राशी बदलामुळे अनेक राशींच्या लोकांवर त्याचा प्रभाव नक्कीच दिसून येईल. काही राशीच्या  लोकांना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायावर परिणाम दिसू शकतो. काही लोकांचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण होतील. सरकारी कामात यश मिळू शकते आणि आर्थिक लाभाचीही शक्यता आहे.


कुंभ राशीमध्ये सूर्याच्या भ्रमणामुळे शनीचा संयोगही तयार होणार आहे.  म्हणजे सूर्य आणि शनि दोघेही कुंभ राशीत जवळपास महिनाभर एकत्र राहणार आहे. वैदिक ज्योतिषात सूर्य आणि शनी एकत्र येणे चांगले मानले जात नाही.  कारण सूर्य आणि शनीचे एकमेकांशी वैर आहे. अशा परिस्थितीत, यामुळे काही राशीच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम देखील होऊ शकतात. तसेच नोकरी-व्यवसायात अडथळे येऊ शकतात. आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कुंभ राशीत सूर्याच्या आगमनाचा कोणत्या राशींवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया.


या राशींना बसणार मोठा फटका


कुंभ राशीत सूर्याचे संक्रमण आणि शनीच्या संयोगामुळे कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जाावे लागणार आहे. नोकरदारांना कामाशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी वाद आणि तणाव वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांचेही नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी  दहा वेळा विचार कराय. अनावश्यक खर्च वाढू शकतो. उसने पैसे देणे टाळावे


या राशींना होणार फायदा


सूर्याच्या राशी बदलामुळे  मिथुन, तूळ आणि सिंह राशीच्या लोकांना  फायदा होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होणार आहे.  नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळतील,  काही जुने वाद मिटल्यामुळे तुम्हाला मोठा  दिलासा मिळेल.


दान करा 


तांब्याचे भांडे, पिवळे किंवा लाल कपडे, गहू, गूळ, लाल चंदन इत्यादी सूर्याशी संबंधित वस्तू दान करा. मनोभावे तुम्हाला वाटेल त्या वस्तू दान करा. कुंडलीतील सूर्याचे दोष दूर होऊन धन-समृद्धी प्राप्त होईल. 


हे ही वाचा :



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)