Surya And Budh Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक वेळेनंतर त्यांची चाल बदलतात. ग्रहांच्या राशी बदलाच्या काळात काही लोकांना शुभ फळ मिळतं, तर काहींना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यातच आता अवघ्या एका महिन्यात बुध (Mercury) आणि सूर्यदेव (Sun) त्यांच्या राशी बदलणार आहेत. ग्रहांचा राजा सूर्य स्वतःच्या राशीत, म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करेल. तर बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा दाता म्हणून ओळखला जाणारा बुध कर्क राशीत वक्री होईल. या काळात अनेक राशींचं नशीब पालटेल, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


कधी होणार ग्रहांचं संक्रमण?


ग्रहांचा राजा सूर्याचं 16 ऑगस्ट, 2024 रोजी संक्रमण होईल. सिंह राशीत संध्याकाळी 7.53 वाजता सूर्य प्रवेश करेल. तर बुध ग्रह गुरुवारी, 22 ऑगस्टला सकाळी 6.22 वाजता कर्क राशीत प्रतिगामी होईल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि तो स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे, अशा स्थितीत हा काळ तुमचाच असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. बुधाची प्रतिगामी चाल देखील तुमच्यासाठी शुभ ठरेल, या काळात तुम्ही पैसे वाचवू शकता, पैसे कमवू शकता आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता. तसेच, अविवाहित लोकांनाही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.


कर्क (Cancer)


सूर्याचं संक्रमण आणि बुधाची प्रतिगामी चाल कर्क राशीसाठी फायदेशीर ठरेल. याचं कारण म्हणजे तुमच्या राशीच्या धनगृहात सूर्य देवाचं संक्रमण आणि तुमच्या राशीच्या चढत्या घरात बुधाची प्रतिगामी चाल असेल. अशा परिस्थितीत हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. जर तुम्हाला पैशांशी संबंधित समस्यांनी घेरलं असेल तर आता तुम्हाला त्यातून आराम मिळू शकेल. तुम्ही तुमचे निर्णय चांगल्यारित्या घेऊ शकता, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. याशिवाय तुमच्यासाठी अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांसाठी देखील येणारा काळ खूप छान असणार आहे. सूर्याची बदलती चाल आणि बुध प्रतिगामी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हा काळ तुमच्या करिअरला नवं वळण देणारा असेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन दरवाजे उघडणार आहेत. जे अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते, त्यांची प्रतीक्षा संपणार आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani News : अवघ्या 82 दिवसांत शनीचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नोकरी-व्यवसायात लाभच लाभ