धुळे : शहरातील गरताडबारी या भागाजवल अपघाताची भीषण घटना घडली आहे. या दुर्घटनेत मुळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आणि मुंबईत कार्यरत असलेले पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ते 27 वर्षांचे होते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ट्रकचालकाने चारचाकी वाहनाला धडक दिल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. 


आणखी दोन जण गंभीर जखमी


या अपघातात हर्षद भदाणे पाटील यांच्या मृत्यूसह आणखी दोन जण या गंभीर जखमी झाले आहेत. सध्या ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात आहेत.   


नेमकं काय घडलं? 


मिळालेल्या माहितीनुसार हर्षद भदाणे पाटील यांच्या चारचाकी वाहनाला धडक देणारा ट्रक कर्नाटक राज्यातून मध्यप्रदेशधील इंदौर या ठिकाणी जाणार होता. ट्रकचालक हा ट्रक वेगात चालवत होता. याच ट्रकने अचानकपणे हर्षल भदाणे ज्या कारमध्ये बसले होते, त्या कारला मागून धडक दिली. अनाचक झालेल्या या अपघातात हर्षद भदाणे यांनी कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण ट्रकचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. परिणामी त्यांचा घटनस्थळीच मृत्यू झाला. या घटनेत आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. 


ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात, नागरिकांनी केला पाठलाग


हा अपघात झाल्यानंतर भेदरलेल्या ट्रकचालकाने घटनस्थळाहून पळ काढला. पण काही नागरिक ट्रकचालकाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करत होते. यात त्याने अन्य काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांनाही चिरडल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, पाठलाग करत असलेल्या नागरिकांनी ट्रकचालकाला गाठून बेदम चोप दिला. या घटनेची माहिती मिळथाच पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. सध्या हा ट्रकचालक तसेच सहचालक धुळे पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 



हेही वाचा :


Buldhana News : शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एस टी बसचा अपघात; तिघांची प्रकृती गंभीर, तर सहा प्रवासी जखमी 


Maharashtra Breaking 30th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...


Eknath Shinde Speech : प्रदीप शर्मांच्या पत्नी शिवसेनेत,पक्ष प्रवेश शिंदेंच्या भाषणाने गाजला