Success Mantra : आजच्या व्यस्त जीवनशैलीत तणाव ही एक सामान्य गोष्ट आहे. कामाचा ताण, घरगुती जबाबदाऱ्या आणि त्याचसोबत अनेक छोट्यामोठ्या समस्या मन अस्वस्थ करतात. अनेक वेळा मनात नकारात्मक विचार आल्याने मन अस्वस्थ होतं. मन शांत नसेल तर कोणतंही काम नीट करता येत नाही. अशा वेळी मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही काही मार्ग (Tips) अवलंबू शकतात. ते नेमके कोणते? जाणून घेऊया.
ध्यान आणि योग (Meditation and Yoga)
जर तुमचं मन नेहमी विचलित असेल, कोणत्या ना कोणत्या विचारात बुडालं असेल तर तुम्ही तुमच्या दिनचर्येत ध्यान आणि योगाचा समावेश करावा. मन शांत करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तर योगामुळे शरीर तर निरोगी राहतेच पण मन शांत होण्यासही मदत होते. प्राणायाम आणि ध्यानाचा नियमित सराव केल्याने तणाव आणि चिंता कमी होते.
सकारात्मक विचार (Positive Thoughts)
सकारात्मक विचार केल्याने नकारात्मक विचार दूर होतात, तणाव कमी होतो आणि कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकद मिळते. जर तुम्हाला तुमचं मन शांत ठेवायचं असेल तर तुमच्या मनात नकारात्मक विचारांना जागा देऊ नका. सकारात्मक विचार विकसित करा आणि नेहमी आशावादी रहा. नेहमी कृतज्ञतेची भावना ठेवा. तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला गेलात तर आपोआप तुमचे विचार सकारात्मक होतील.
निरोगी जीवनशैली अंगीकारा (Follow Positive Lifestyle)
निरोगी जीवनशैली आपल्या जीवनातील प्रत्येक पैलू सुधारते. निरोगी जीवनशैलीमुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी तर राहालच, पण मानसिकदृष्ट्या देखील तुम्ही फिट राहाल आणि भावनांवर नियंत्रण मिळवणं तुमच्यासाठी सोपं जाईल. यासाठी तुम्ही पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि 7-8 तास चांगली झोप घ्या. अल्कोहोल, धूम्रपान आणि कॅफिनचं सेवन मर्यादित करा.
तुमच्या भावना व्यक्त करा (Express Your Feelings)
आपल्या भावना दडपण्याऐवजी त्या कोणाकडे तरी व्यक्त करा. भावना व्यक्त केल्याने मन शांत होतं. भावना व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोकांना इतरांशी बोलणं फायद्याचं वाटतं, तर काहींना त्यांच्या भावना लेखन किंवा कलेद्वारे व्यक्त करणं आवडतं. यासाठी तुम्ही थेरपिस्टचा सल्ला देखील घेऊ शकता.
तुम्हाला जे आवडतं ते करा (Follow Your Passion)
जर तुमचं मन अस्वस्थ असेल तर तुम्हाला आवडेल असं काहीतरी करा. तुमचे छंद जोपासा. तुमचे छंद पूर्ण केल्याने तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचं मन शांत राहील. यासाठी गाणी ऐका, पुस्तकं वाचा, चित्रकला करा, रोज थोडा वेळ निसर्गात घालवा, उद्यानात फेरफटका मारा किंवा काही वेळ झाडाखाली बसा.
हेही वाचा: