Boiling Milk : दूध हे आरोग्यासाठी खूप फायदेशील मानले जाते. दुधाचा उपयोग पूजेसाठी देखील केला जातो. आध्यात्मिकदृष्ट्याही दुधाचे विशेष महत्त्व आहे. धार्मिकदृष्ट्या कच्चे दूध शिवलिंगावर अर्पण करण्यापासून ते पूजेच्या साहित्यात ठेवण्यापर्यंत अनेक ठिकाणी उपयोग केला जातो. शकुनशास्त्रातही दुधाचे अनेक शुभ आणि अशुभ संकेत आहेत. वास्तूमध्ये दूध हा चंद्राचा कारक मानला जातो. यानुसार उकळते दूध सांडणे फारच अशुभ मानले जाते. चला जाणून घेऊया उकळलेले दूध पडल्यास कोणते अशुभ परिणाम होतात.
वास्तूनुसार गॅसवर उकळते दूध पुन्हा पुन्हा पडल्याने घरातील सदस्यांवर मानसिक परिणाम होतो. सांडलेल्या दुधामुळे चंद्रदोष वाढतो आणि त्यामुळे घरात नेहमीच तणाव असतो. त्याचा मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होतो.
गॅसवर दूध उकळताना अग्नीचा उपयोग होतो आणि तो मंगळाचा कारक असतो. मंगळ आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध मानले जातात. प्रत्येक वेळी उकळते दूध सांडल्याने कुटुंबात भांडणाची परिस्थिती निर्माण होते. चंद्र आणि मंगळाच्या भेटीमुळे घरात गरिबी येऊ लागते.
दूध उकळल्यानंतर सांडणे हे काही वेळा सामान्य असू शकते, परंतु जर असे वारंवार घडले तर ते घरामध्ये काही वास्तुदोष असल्याचे सूचित करते. वास्तुदोषांमुळे घरात सुख-समृद्धी राहत नाही आणि नेहमी पैशाची कमतरता भासते.
घरातील एखादा सदस्य काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल आणि त्यावेळी गॅसवरील उकळते दूध सांडले तर तर ते अशुभ मानले जाते. अशा स्थितीत तुम्ही कामाच्या निमित्ताने बाहेर पडू नका. उकळते दूध सांडणे हे देखील काही रोग येण्याचे संकेत देते.
दूध उकळले की अन्नपूर्णा देवी कोपते असे मानले जाते. जर तुमच्यासोबत असे वारंवार घडत असेल तर तुम्ही देवी मातेची माफी मागावी. चंद्र दोष टाळण्यासाठी मोती धारण करून चंद्रदेवाला जल अर्पण करणे उत्तम. चंद्र आणि मंगळ शांत करण्यासाठी देखील उपाय योजले पाहिजेत. घरातून बाहेर पडताना जर दूध सांडले तर तर देवाला गोड पदार्थ अर्पण करूनच घरातून बाहेर पडावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या