Monday Remedies : सोमवार हा भगवान भोलेनाथला समर्पित आहे. सोमवारी भगवान शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. सोमवारी भाविक उपवास करतात आणि खऱ्या मनाने भगवान शंकराची पूजा करतात. असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय भोळे असून भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. या दिवशी लोक भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. असे मानले जाते की सोमवारी काही सोपे उपाय केल्यास कर्जापासून मुक्ती मिळू शकते. चला या उपायांबद्दल जाणून घेऊया.


जीवनातील सर्व अडचणी होतील दूर


सोमवारी मनापासून भगवान शिवाची आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी उठून स्नान करून शंकराची पूजा करावी.


अभिषेक केल्याने महादेव होतील लवकर प्रसन्न


सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी शिवलिंगावर चंदन, अक्षत, बेलाची पाने, धतुरा, दूध आणि गंगाजल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात, असं मानलं जातं.


कर्जापासून मुक्त होण्यास मदत करतो हा उपाय


शिवपुराणानुसार, जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर सोमवारी अक्षता, म्हणजेच तांदूळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे कर्जाच्या समस्येतून दिलासा मिळतो.


या उपायाने जीवनातील अडथळे दूर होतील


पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. सोमवारी हा उपाय केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते.


वैवाहिक जीवन होईल सुखी


सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर, गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं.  भोलेनाथाची उदबत्ती आणि दिवा लावून आरती करावी आणि प्रसाद वाटप करावा. असं केल्याने शिवाच्या कृपेने सर्व संकटं दूर होतात आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदते.


कुटुंबात परस्पर प्रेम राहील कायम


पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सुख-सुविधा वाढतात आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. शिवपुराणानुसार, भगवान शंकराला गव्हापासून बनवलेले पदार्थ अर्पण करणं श्रेष्ठ मानलं जातं. तसेच सोमवारी गहू दान केल्याने कुटुंबात वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.


घरात नांदेल सुख-शांती


सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप केल्याने भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी कच्च्या गाईचं दूध शिवलिंगावर अर्पण करणं देखील एक प्रभावी उपाय मानला जातो. सोमवारी अंघोळ केल्यावर पांढरे वस्त्र परिधान करावे. या दिवशी पांढर्‍या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावे,. यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख-शांती नांदते.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Numerology : प्रचंड गर्विष्ठ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; स्वत:लाच समजतात शहाणे, दुसऱ्यांना कमी लेखण्यात सर्वात पुढे