Surya Grahan 2024: ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहणाला (Eclipse) फार महत्त्व आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला 8 एप्रिल  2024 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 54 वर्षानतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे. शेवटचे पूर्ण सूर्यग्रहण 1970 साली पडले होते. त्यानंतर आता 54 वर्षानंतर चैत्र नवरात्रीच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे.  त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे. 


पंचांगानुसार 2024 मध्ये 8 एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण  सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री दोन पर्यंत सुरु होणार आहे.  या सूर्यग्रहणाचा सर्व 12 राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे. मात्र, यापैकी काही राशींसाठी हे सूर्यग्रहण जीवनात नकारात्मक बदल घडवून आणणारे ठरु शकते. त्यामुळे या राशींना जरा जपून राहण्याचा सल्ला दिला जातो.   


मेष  (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण चांगले असणार नाही. तुमचा सन्मान  दुखावला जाऊ शकतो. तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. काही लोकांना मोठ्या प्रमाणात धनहानी होऊ शकते. मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्ही कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या, अन्यथा तुमच्या अडचणी आणखी वाढू शकतात. व्यवसायात नुकसान होऊ शकते. 


कन्या  (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फारच अशुभ असणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. व्यवसायात तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. तुमच्या  नात्यात दुरावा येऊ शकतो. या काळात तुमचे आरोग्यही बिघडू शकते. कन्या राशीच्या लोकांनी या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नये. सध्या घर किंवा कार यासारख्या वस्तू खरेदी करणे टाळा. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकते. काहींचे वडिलांसोबतचे संबंध बिघडू शकतात.


धनु  (Sagittarius)


सूर्यग्रहण धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप गोंधळ निर्माण करू शकते. या काळात तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात. व्यवसायातही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही कोणतेही पाऊल अतिशय काळजीपूर्वक उचलले पाहिजे.कुटुंबातील सदस्यासोबत तुमचा वाद वाढू शकतो. यावेळी पैशाचे व्यवहार टाळावेत. ग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या जास्त ताणामुळे तुमची चिडचिड वाढेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :


Papamochani Ekadashi 2024: चुका काय महापाप झाले असतील तर मिळेल मुक्ती, जाणून घ्या वयाच्या 80 वर्षापर्यंत का दिला जातो पापमोचनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला