Surya Grahan 2024 : यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan 2024) आज, म्हणजेच सोमवार 8 एप्रिल रोजी फाल्गुन कृष्ण अमावास्येच्या दिवशी होणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहण असून हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणविषयक जे धार्मिक नियम पाळले जातात, तसे कोणतेही धार्मिक नियम भारतात पाळण्याची गरज नाही, असं ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण (D. K. Soman) यांनी सांगितलं आहे.


पुढे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले, आज असलेलं खग्रास सूर्यग्रहण हे अमेरिकेतील विविध राज्यातून दिसणार आहे. अमेरिकेतील लोक सूर्यग्रहण पाहू शकतील. भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. 


ग्रहणाचा दुसरा दिवस, म्हणजेच मंगळवार, 9 एप्रिल रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे, म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस. या दिवशी शालिवाहन शके 1946 चा प्रारंभ होत आहे. खग्रास सूर्यग्रहणाचा आणि गुढीपाडव्याचा काहीही संबंध नाही, त्यामुळे गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणेच उत्साहात साजरा करावा, असं दा. कृ. सोमण म्हणाले. या दिवशी उत्साहाने गुढी उभारायची आहे, गुढी पूजन करायचं आहे आणि पंचांग वाचन करायचं आहे. खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याने ग्रहणविषयक कोणतेही धार्मिक नियम सोमवारी पाळण्याची आवश्यकता नाही.


सूर्यग्रहण नेमकं कुठे दिसणार?


2024 सालातील पहिलं सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण पॅसिफिक पश्चिम युरोप, अटलांटिक, आर्क्टिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका (अलास्का वगळता), कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, इंग्लंडचा वायव्य प्रदेश आणि आयर्लंडमध्ये होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात न दिसू लागल्याने त्याला धार्मिक महत्त्वही राहणार नाही आणि तो सुतक काळ मानला जाणार नाही. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण, जे मीन आणि रेवती नक्षत्रात होईल.


सूर्यग्रहणाची वेळ : 8 एप्रिल रोजी रात्री 09:12 ते मध्यरात्री 01:25.
सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी : 4 तास 25 मिनिटे


ऑक्टोबरमध्ये 2024 वर्षातील दुसरं सूर्यग्रहण


2024 सालचे दुसरे सूर्यग्रहण 2 आणि 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणार आहे. 2024 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9:13 ते 3:17 पर्यंत राहील. ग्रहणाचा एकूण कालावधी 6 तास 4 मिनिटे असेल. दुसऱ्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 2 ऑक्टोबरला सकाळी 9.13 वाजता सुरू होईल.


हेही वाचा:


Solar Eclipse 2024 : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्यग्रहणाच्या दिवशी बनले दुर्मिळ योग; 'या' राशीचे लोक होणार गडगंज श्रीमंत, एका महिन्यात पालटणार नशीब