Shukra-Shani Yuti 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) ग्रहांचा न्यायाधीश म्हटलं जातं. शनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. सध्या शनी (Lord Shani) कुंभ राशीत विराजमान आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी शुक्र ग्रहसुद्धा कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष 2025 मध्ये शुक्र-शनीची युती दिसून येणार आहे. शनी-शुक्राच्या युतीने अनेक राशींच्या लोकांना आर्थिक, करिअर आणि व्यावसायिकदृष्ट्या लाभ मिळणार आहे. त्यामुळे या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, 28 डिसेंबर 2024 रोजी शुक्राचा शुनीच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश होणार आहे. शनिवारी रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी शुक्र ग्रह कुंभ राशीत संक्रमण करणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शुक्र-शनीची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराचं आर्थिकरित्या सहकार्य मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र-शनीची युती फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरीत तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तुमच्या व्यवसायात वाढ होईल. तुमचा व्यवसाय अधिक विस्तारेल. तसेच अचानक धनलाभ होईल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी शनी-शुक्राची युती फार चांगली ठरणार आहे. या काळात तुम्ही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ देखील मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनी-शुक्राची युती फार खास ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. तसेच जे लोक रोजगाराच्या शोधात आहेत त्यांना चांगला रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शुक्र-शनीची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरीत तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकते. तुमचा व्यवसाय अधिक विस्ताराने वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :