Shukra Nakshatra Parivartan 2024 : ज्योतिषशास्त्रात शुक्र (Venus) हा प्रेम, आकर्षण, संपत्ती आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत शुक्राच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच होतो. शुक्र ठराविक काळानंतर राशीसह नक्षत्र देखील बदलतो, ज्याचा देखील परिणाम सर्व राशींवर होतो.
वैदिक पंचांगानुसार, यावेळी शुक्र ज्येष्ठ नक्षत्रात स्थित आहे. पण येत्या 7 तारखेला तो नक्षत्र बदलून मूळ नक्षत्रात प्रवेश करेल.शुक्र हा केतूच्या नक्षत्रात गेल्याने काही राशीच्या लोकांचं नशीब उजळेल, तर काही राशींचं नुकसान होईल. शुक्राने मूळ नक्षत्रात प्रवेश केल्यावर कोणत्या राशींना लाभ होईल? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा चांगला प्रभाव मेष राशीवर पडणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. यासोबतच करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात भरपूर फायदा होणार आहे, जास्त नफा मिळू शकतो. परदेशात नवीन ऑर्डर मिळू शकतात. याद्वारे तुम्हाला व्यवसायात मोठी संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. यासह, आपण बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. तुमची लव्ह लाईफ चांगली राहणार आहे, जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांवर शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा चांगला लाभ मिळेल. या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्ती आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून बरेच फायदे मिळू शकतात. यासोबतच विमा पॉलिसीद्वारे अनेक फायदे मिळू शकतात. करिअर क्षेत्राविषयी बोलायचं झाल्यास, तुम्ही केलेल्या कामावर अधिकारी खूश असतील. यासोबतच व्यवसायातही भरपूर नफा होईल. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील.
कन्या रास (Virgo)
शुक्र मूळ नक्षत्रात असल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. सुख-समृद्धीत वाढ होईल. आत्मविश्वास वाढू शकतो. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. मान-सन्मानात वाढ होऊ शकते. तुम्ही बनवलेलं धोरण व्यवसायातही उपयोगी पडू शकतं. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवू शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. यासोबतच तुम्ही बचत देखील करू शकतो. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन चांगलं जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :