Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह (Shukra Gochar) हा वैभव, सुख-संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानला जातो. यासाठीच जेव्हा शुक्र ग्रह आपल्या चालीत बदल करतात. तेव्हा त्याचा अनेक राशींवर प्रभाव पडताना दिसतो. माहितीसाठी, धन दाता शुक्र ग्रह सप्टेंबर महिन्यात कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याचा सर्व राशींवर प्रभाव पडताना दिसतो. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शुक्र ग्रहाचं संक्रमण मिथुन राशीसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या चतुर्थ स्थानी शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत वाढ झालेली दिसेल. तसेच, या कालावधीत तुम्ही नवीन लग्जरी वस्तूंची खरेदी करु शकता. संपत्तीशी संबंधित सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तसेच, तुम्हाला वाहनसुख घेता येईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन फार शुभकारक असणार आहे. शुक्र ग्रह या राशीच्या संपत्तीच्या स्थानी संक्रमण करणार आहे. या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, अनेक नवीन योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकाल.
मकर रास (Capricorn Horoscope)
शुक्र ग्रहाचं संक्रमण मकर राशीसाठी फार फलदायक ठरणार आहे. या राशीच्या नवव्या स्थानी शुक्र ग्रह संक्रमण करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकाल. तसेच, उत्पन्नाचे अनेक सोर्स तुमच्यासमोर उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :