Venus Planet Transit : वैदिक पंचांगानुसार, शुक्र आपल्या उच्च राशीत, म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींचं भाग्य उजळेल. या काळात संपत्तीत अपार वाढ होईल.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या उच्च आणि स्वतःच्या राशीत प्रवेश करतात, ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर व्यापक प्रभाव पडतो. 2025 च्या सुरुवातीला धनाचा दाता शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे, ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी प्रचंड आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला वैवाहिक सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होऊ शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्राचे संक्रमण तुमच्या उत्पन्न आणि लाभाच्या घरात होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच, आपण उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांद्वारे पैसे कमवू शकता. या काळात, व्यावसायिक सहली तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील, नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. तसेच, यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. तसेच या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नातेसंबंध अधिक दृढ होतील.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण अनुकूल ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून धन आणि वाणी स्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल. तसेच, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात व्यावसायिकांना मोठा नफा होण्याची शक्यता आहे. दुकानदारांच्या कुंडलीत मालमत्ता खरेदीचा योग आहे. तसेच, यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
मीन रास (Pisces)
शुक्राच्या राशीतील बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. या वेळी कौटुंबिक संबंध मधुर होतील. तसेच या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. त्याचबरोबर जोडीदारासोबतचे नातेही घट्ट होतील. यावेळी अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच, नवीन व्यावसायिक संबंधांच्या निर्मितीचा व्यवसायावर सकारात्मक परिणाम होईल. आर्थिक लाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: