Shukra Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, धन-वैभव, सुख-समृद्धीचा कारक मानला जातो. शुक्र (Shukra) ग्रह दर 26 दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. याचा प्रत्येक राशीवर कोणत्या ना कोणत्या कारणाने जीवनावर परिणाम होतो. 2024 वर्षाच्या डिसेंबर महिन्यात शुक्र ग्रह दोनदा राशी परिवर्तन करणार आहे. शनीची रास मकर आणि कुंभमध्ये संक्रमण केल्याने काही राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


द्रिक पंचांगानुसार,शुक्र ग्रह 28 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शुक्र ग्रह 28 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे. 


मेष रास (Aries Horoscope)


शुक्र ग्रह मेष राशीच्या अकराव्या चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात बहिण-भावंडांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या भौतिक सुखात चांगली वाढ झालेली दिसेल. त्याचबरोबर तुम्हाला धन कमावण्याची चांगली संधी मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. त्याचबरोबर, मित्र परिवार आणि कुटुंबियांबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली वार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तुमच्या स्वास्थ्यातही चांगली सुधारणा झालेली दिसेल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


शुक्र ग्रहाचं कुंभ राशीतील संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. मिथुन राशीत शुक्र ग्रह नवव्या चरणात असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला उच्च शिक्षणाची चांगली संधी मिळेल. तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल. या काळात तुम्ही पूर्ण वेळ धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष द्याल. धार्मिक यात्रेला जाण्याचा चांगला योग आहे. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लग्न चरणात शुक्र ग्रह संक्रमण करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक काळापासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तसेच, तुमची तब्येत चांगली असणार आहे. तुमचं वैवाहिक जीवन सुखी असेल. तसेच, तुम्ही नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करु शकता. उत्पन्नाचे नवीन पर्याय तुमच्यासमोर खुले होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :      


Shani Gochar 2024 : शनीच्या संक्रमणामुळे 'या' 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 2025 मध्ये सावधानतेचा इशारा