Astrology : ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला राशी बदलतो. अशा स्थितीत, एका राशीत पुन्हा येण्यासाठी सूर्याला वर्षभराचा कालावधी लागतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याच्या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडत असतो. त्यात आता सूर्याने 15 जूनला बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश केला आहे. जिथे बुध आणि शुक्र हे ग्रह आधीच उपस्थित आहेत.


सूर्य आणि बुधाच्या संयोगाने बुधादित्य योग (Budhaditya Yog) तयार होत आहे, तर शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगाने शुक्रादित्य योग (Shukraditya Yog) तयार होत आहे. एक वर्षानंतर मिथुन राशीत शुक्रादित्य योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो, त्यांची अडकलेली कामं पूर्ण होण्यासोबतच संपत्तीतही वाढ होईल. शुक्रादित्य योग तयार झाल्यामुळे 16 जुलैपर्यंत कोणत्या राशींना (Zodiac Signs) बंपर लाभ होणार? जाणून घेऊया.


कन्या रास (Virgo)


शुक्रादित्य योगाच्या निर्मितीमुळे कन्या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळू शकतो. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमची नोकरी पटत नसेल तर तुम्ही दुसरी नोकरी बघू शकता, यात तुमचा फायदाच होईल. काही जणांना प्रमोशनसोबत चांगला पगार मिळू शकतो. या काळात नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. न्यायालयीन प्रकरणांमध्येही तुम्हाला यश मिळू शकतं. जमिनीशी संबंधित कामात यश मिळू शकतं. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो, नवीन प्रकल्प मिळण्याची भरपूर शक्यता आहे. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील.


कुंभ रास (Aquarius)


शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगाने तयार झालेला शुक्रादित्य योग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. नोकरदार लोकांना काही प्रवास करावा लागू शकतो. पण तुम्हाला या प्रवासाचा फायदा होईल. नोकरीत नवीन संधीही मिळू शकतात, अशा परिस्थितीत तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून पैसे कमवू शकता. व्यवसाय क्षेत्राबद्दल बोलायचं तर, तुम्ही केलेली योजना यशस्वी होऊ शकते. या काळात तुम्ही नफ्यात असाल. पैशाबद्दल बोलायचं तर, या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. यासोबतच भविष्यासाठीही तुम्ही चांगली बचत कराल. तुमचं वैवाहिक जीवन या काळात चांगलं राहील.


सिंह रास (Leo)


या योगाच्या निर्मितीमुळे सिंह राशीचे लोक सुख-सुविधांनी परिपूर्ण असतील. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला दिलासा मिळेल. नोकरदार लोकांसाठीही हा काळ चांगला आहे. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. यासोबतच प्रमोशनसोबत काही मोठी जबाबदारीही दिली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठा नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा :


Trigrahi Yog : तब्बल 100 वर्षांनंतर शुक्र, बुध आणि सूर्याची युती; 'या' 3 राशींनी आधीच सावध व्हा, पाण्यासारखा पैसा जाणार वाया