Nirjala Ekadashi 2024 : सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi 2024) व्रताला अधिक महत्त्व आहे. यावर्षी निर्जला एकादशीच्या तिथीबाबत काहीसा गोंधळ आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीचं व्रत 17 की 18 जूनला? नेमकी एकादशी पकडायची कधी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हिंदू धर्मात कोणत्याही व्रताची सुरुवात सूर्योदयापासून होते. अशात यावर्षी निर्जला एकादशीचं व्रत उदय तिथीनुसार पाळलं जाईल. या व्रताची अचूक तारीख, पारण वेळ आणि या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया.
निर्जला एकादशी 2024 कधी आहे? (Nirjala Ekadashi 2024 Date)
पंचांगानुसार, ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी 17 जून रोजी पहाटे 04:42 पासून सुरू होत असून ती 18 जून रोजी सकाळी 06:23 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, निर्जला एकादशीचं व्रत 18 जूनला पाळलं जाईल.
निर्जला एकादशी 2024 पारण वेळ
निर्जला एकादशी व्रताची पारण वेळ : 19 जून रोजी सकाळी 5.24 ते 7.28 दरम्यान
19 जून रोजी पहाटे 5.21 ते 7.28 पर्यंत निर्जला एकादशीच्या पारणाची वेळ आहे.
निर्जला एकादशीचे महत्त्व (Nirjala Ekadashi Vrat Significance)
निर्जला एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या एकादशीला सर्वात कठीण एकादशी मानलं जातं. ज्या व्यक्तीला वर्षातील 24 एकादशी पाळता येत नाही, त्यांनी निर्जला एकादशीचंच व्रत करावं, असं मानलं जातं. असं केल्याने इतर एकादशींचेही लाभ मिळतात. या एकादशीला भगवान विष्णूची पूजा न करता उपवास करून न खाता पिता व्रत पाळलं जातं. याला पांडव एकादशी आणि भीमसेनी एकादशी असंही म्हणतात.
निर्जला एकादशीला या मंत्रांचा जप करा
1- ओम नमो भगवते वासुदेवाय
2- श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
3- ओम नारायणाय विद्महे। वासुदेवाया धीमहि । तन्नो विष्णु प्रचोदयात् ।
4- ओम विष्णवे नम:
5- ओम हूं विष्णवे नम:
6- ओम नमो नारायण. श्री मन नारायण नारायण हरी हरी ।
7- लक्ष्मी विनायक मंत्र -
दंतभये चक्र दारो दधानम्,
कराग्रागस्वर्णघटम त्रिनेत्रम्
धृताजया लिंगिताम्बाधिपुत्रया
लक्ष्मी गणेश कनकभामिडे ।
हे नाथ नारायण वासुदेवाय ।
8- ओम अं वासुदेवाय नम:
9- ओम अं संकर्षणाय नम:
10- ओम अं प्रद्युम्नाय नम:
11- ओम अ: अनिरुद्धाय नम:
12- ओम नारायणाय नम:
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :