Shubh Yog: नव्या आर्थिक वर्षाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. मार्च महिन्याचा शेवट जवळ आला असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. मार्च महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस राहिले असून लवकरच हा महिना संपणार आहे. मार्च महिन्याचे हे शेवटचे दोन दिवस अतिशय शुभ असणार आहे. कारण मार्च महिन्याच्या अखेरीस रवी योग (Ravi Yog) तयार होत आहे. रवी योग हा अतिशय शुभ मानला जातो.जाणून घ्या रवि योगात कोणते लाभ होणार आहे.
मार्च महिन्यात 30 आणि 31 तारखेला रवी योग तयार होत आहे. रवी योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. रवियोग सर्व दोषांचा नाश करतो. या योगात केलेले कार्य शुभ फळ देते. रवियोगात केलेले दान हे शंभर पटीने प्राप्त होते. रवी योगामध्ये सूर्य देवाचा प्रभाव जास्त असतो. रवी योगात कोणतेही काम केले तर त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त असते, असे मानले जाते. रवियोग शनिवारी, 30 मार्च रोजी रात्री 10:03 मिनिटानी ते 31 मार्च रोजी सकाळी 08:00 पर्यंत राहील, आणि 31 मार्चला रात्री 10.57 मिनिट 1 एप्रिलला संपूर्ण दिवसभर राहील. रवी योग रविवारी रात्री 11.12 मिनिटांनी संपेल मार्चसोबतच तुम्ही एप्रिल महिन्याची सुरुवातही या शुभ रवि योगाने होणार आहेृ. या दिवशी केलेले कार्य तुम्हाला यश मिळवून देईल.
रवी योगात मिळते अनेक समस्यांपासून मुक्ती
या योगामध्ये सूर्याची पूजा करावी. जर तुम्हाला कोणतेही काम करायचे असेल तर तुम्ही ते या योगामध्ये करू शकता.हा अतिशय लाभदायक योग असून या योगात सुरू केलेली सर्व कामे निश्चितपणे पूर्ण होतात. असे मानले जाते की रवी योगामुळेच अनेक अशुभ योग दूर होतात. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. गाईला गहू द्यावे. सूर्यदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने मनाच्या इच्छा तर पूर्ण होतातच पण अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. रवियोगात केलेले प्रयत्न कधीही अपयशी होत नाहीत.
रवि योग खरे तर भगवान सूर्याचा आशीर्वाद मिळविण्याची उत्तम संधी आहे. पंडिवियोगाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्यदेवाची पुजा विधीनुसार करावी. सूर्य देवाचा मंत्र "ओम घृणी सूर्याय नमः" चा जप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :