Astro Tips:  फूल हे भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने पुण्य वाढते, पापांचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ मिळते, असे  शास्त्रात म्हटले जाते. देवाचा साज शृंगार करताना नेहमी देवाच्या डोक्यावर फुलांची सजावट केली जाते आणि पूजा करताना देवाच्या चरणी फुलं अर्पण करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. आज आपण अशा चार फुलांची माहिती घेणार आहोत ज्याला पूजा अर्चनेमध्ये विशेष  महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथांनुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचे विशेष महत्त्व असते.  तेवढेच महत्त्व पूजा करताना वापरण्यात येणाऱ्या फुलांचे आहे. जर आम्ही तुम्हाला म्हटलो की, तुम्ही पूजा करताना वापरण्यात येणाऱ्या फुलांचा थेट ग्रहांशी संबध आहे. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहे. 


झेंडू (Marigold)


झेंडुच्या फुलांचे अनेक प्रकार आहेत. परंतु पिवळ्या रंगाच्या झेंडुला विशेष महत्त्व आहे.  झेंडुचे फूल गुरु ग्रहाशी संबंधित आहे. त्याचा वापर करून ज्ञान, बुद्धी  प्राप्त होते. भगवान विष्णूला पिवळ्या झेंडुच्या फुलांची माळ नियमितपणे अर्पण केल्याने संततीविषयक समस्या सुटतात


गुलाब (Rose)


गुलाबाचे फुल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते.   गुलाबाचे फूल हे एक अद्भुत आणि चमत्कारी फूल आहे, ज्याचा थेट परिणाम नातेसंबंधांवर होतो. पूजेमध्ये फक्त लाल गुलाबाचा वापर केला जातो. लाल गुलाबाचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे आणि तर फुलाच्या  सुगंधाचा संबध  शुक्राशी संबंधित आहे. गुलाबाच्या फुलाचा वापर केल्याने  प्रेम वाढते. नातेसंबंध दृढ होतात. देवांचा  आशीर्वाद मिळतो. लक्ष्मीला देवीला नियमितपणे गुलाब अर्पण केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते. गुलाब दिल्याने नाती मजबूत होतात.


कमळ (Lotus) 


कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे आणि त्याचप्रमाणे, पौराणिक महत्त्व आणि भारतीय देवी-देवतांच्या फुलांचे बरेच संबंध आहेत. जगातील सर्वात सुंदर फूल देखील सर्वात पवित्र आहे  
कमळाचे फूल हे पूर्णपणे  आध्यात्मिक फूल मानले जाते. पांढऱ्या रंगाचे कमळ हे सर्वात शुद्ध आणि उर्जेमध्ये सर्वोत्तम आहे. कमळाच्या  फुलाचा संबध नवग्रह आणि सकरात्मक उर्जेशी संबंधित आहे. कोणत्याही एकादशीला श्रीकृष्णाला दोन कमळाची फुले अर्पण केल्यास संततीची इच्छा पूर्ण होते.


जास्वंद (Hibiscus)


 जास्वंदीच्या फुलाचा वापर पुजेदरम्यान केला जातो. असे मानले जाते की देवी पुजनादरम्यान हे फूल अर्पण केल्याने घरात नेहमी आनंदी वातावरण राहते. विशेषतः देवी आणि सूर्यदेवाच्या पूजेमध्ये याचा वापर केला जातो. देवीला नियमितपणे जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने तुमच्या घरात कधीच धन कमतरता राहणार नाही. जास्वंदीच्या फुलांनी सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्याचा आशीर्वाद मिळतो. सर्व प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून आराम मिळतो. जास्वंदीने  ग्रह पीडेपासून मुक्ती मिळते. जर तुम्ही सूर्य देवतेच्या उपासनेदरम्यान नियमितपणे जास्वंदीचे फूल अर्पण करत असाल तर हे तुमचे मन नेहमी उर्जावान ठेवते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :