Shravan Somvar Wishes In Marathi : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार महत्व आहे. शिवभक्तीसाठी असलेला हा श्रावण महिना 5 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. हा महिना अनेक सण-समारंभ, व्रत-वैकल्यांनी भरलेला असतो. या महिन्यातील प्रत्येक दिवस खास असतो. 5 ऑगस्टपासून सुरू झालेला श्रावण महिना 3 सप्टेंबरला संपन्न होईल. या निमित्त तुमच्या प्रियजनांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे खास संदेश (Shravan Somvar Wishes in Marathi) पाठवू शकता.

Continues below advertisement

श्रावणी सोमवार शुभेच्छा संदेश (Shravan Somvar Wishes In Marathi)

रंग रंगात रंगला श्रावणनभ नभात उतरला श्रावणपानापानात लपला श्रावणफुलाफुलांत उमलला श्रावणश्रावण महिन्याच्या मन भरून शुभेच्छा!

श्रावण मासाला झाला प्रारंभकरू शिवाच्या पूजेला आरंभठेऊ शिवाचे व्रत होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्णश्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

Continues below advertisement

महाकाल नावाची किल्लीउघडेल तुमच्या नशिबाची खिडकी,होतील सर्व कामे पूर्ण तुमचीश्री शिव शंकराची हीच महती,ओम नम: शिवायश्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! 

परंपरेचे करूया जतनआला आहे श्रावण...श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्याआला तो श्रावण पुन्हा आला…श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!  

पवित्र श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!

निसर्ग आलंय बहरून,मनही आलंय मोहरून,रंगात तुझ्या नहाण्या,मन होई पाखरू पाखरूश्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सणासुदीची घेऊन उधळणआला रे आला हसरा श्रावण!श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!  

ओम नमः शिवायबम बम भोलेश्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहेशिव अनंत, शिव ब्रम्ह आहेशिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्तीश्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!  

महादेवाला करू वंदनवाहू बेलाचे पानमहादेवा, सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांनाश्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!  

आनंद माझ्या मनात माईना,सृष्टी सजली बदलली दृष्टीघेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणीश्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

चाहूल तुझी लागताच येते मन बहरूनअशा या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा!

हेही वाचा:

Shravan 2024 : तब्बल 71 वर्षांनंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून; 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, महादेवाच्या कृपेने होणार अपार धनलाभ

Shravan 2024 : आजपासून श्रावण सुरू; पहिल्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?