Shravan 2025: अवघ्या काही दिवसात श्रावण महिना सुरू होतोय. श्रावण महिना हा संपूर्ण शिवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, विविध पुराणांनुसार, कैलास पर्वत हे भगवान शिवाचे निवासस्थान मानले जाते, मात्र असे असले तरी, श्रावण महिन्यात भोलेनाथ कैलास सोडून एका विशेष ठिकाणी राहतात. ते ठिकाण कोणते आहे ते जाणून घेऊया...
भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम
हिंदू पंचांगानुसार, 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना सुरू होणार आहे. जो भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. अशी धार्मिक श्रद्धा आहे की श्रावण हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे. या महिन्यात शिवभक्त जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि उपवास करून भगवान शिव यांना प्रसन्न करतात. असे म्हटले जाते की भोलेनाथांना लवकर प्रसन्न करण्यासाठी सावन महिना सर्वोत्तम आहे. कावड यात्रा देखील याच महिन्यात सुरू होते. म्हणूनच हिंदू धर्मात श्रावण हा खूप पवित्र मानला जातो.
श्रावणात भगवान शिव नेमकं कुठून विश्वाचं नियंत्रण करतात?
धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिन्याचे महत्त्व खूप वाढते, कारण या महिन्यात भोलेनाथ पृथ्वीवर राहतात. भगवान शिव यांचे निवासस्थान कैलास पर्वत असले तरी, खास करून श्रावण महिन्यात भोलेनाथ कैलास सोडून पृथ्वीवर राहतात आणि तेथून विश्वाचे नियंत्रण करतात. अशा परिस्थितीत, ते ठिकाण कोणते आहे ते जाणून घेऊया.
भगवान शिव कैलास पर्वत सोडून का राहतात?
धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यात भगवान शिव कैलास पर्वत सोडून ज्या ठिकाणी राहतात, ते ठिकाण दुसरे तिसरे तिसरे कुठलेच नसून भगवान शिव यांची सासरवाडी आहे. भगवान शिव यांचे सासर हरिद्वारमधील कंखल येथे आहे. कंखल हे विशेषतः दक्षेश्वर महादेव मंदिरासाठी देखील ओळखले जाते. अशी धार्मिक श्रद्धा आहे की भगवान शिव आणि त्यांची प्रथम पत्नी देवी सती यांचा विवाह याच मंदिरात झाला होता.
श्रावणात भगवान शिव सासरवाडीला का राहतात?
धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यात भगवान शिव त्यांच्या सासरी निवास करतात. म्हणूनच, या महिन्यात हे स्थान खूप महत्वाचे मानले जाते. श्रावण महिन्यात दूरदूरून शिवभक्त कंखल येथील दक्षेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात आणि भोलेनाथची पूजा करतात.
शिवपुराणात काय म्हटलंय..
शिवपुराणानुसार, एकदा देवी सतीचे वडील दक्ष प्रजापती यांनी हरिद्वार येथील कंखल येथे एक यज्ञ आयोजित केला होता, ज्यामध्ये त्यांनी भगवान शिव यांना आमंत्रित केले नव्हते. परंतु आमंत्रण न मिळाल्याने माता सती यांनी भगवान शिवांना यज्ञात सहभागी होण्याचा आग्रह धरण्यास सुरुवात केली. जेव्हा सती माता आणि भगवान शिव दक्ष प्रजापती यांच्या यज्ञात पोहोचले तेव्हा सर्व देवांनी तेथे भगवान शिवाचा अपमान केला, जो सती देवी सहन करू शकल्या नाहीत आणि तिने यज्ञाच्या अग्नीत आपले प्राण अर्पण केले.
हे पाहून भगवान शिव खूप क्रोधित झाले आणि क्रोधात शिवाने वीर भद्राचे रूप धारण केले आणि दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केला. त्यानंतर, सर्व देवतांच्या प्रार्थनेवरून, भगवान शिवांनी बकरीचे डोके ठेवून दक्ष प्रजापतीला पुनरुज्जीवित केले, त्यानंतर दक्ष प्रजापतींनी भोलेनाथ यांची माफी मागितली.
तसेच, दक्ष प्रजापतीने भोलेनाथांकडून वचन घेतले की ते दरवर्षी श्रावण महिन्यात त्यांच्या ठिकाणी राहतील आणि त्यांची सेवा करण्याची संधी देतील. तेव्हापासून भगवान शिव दरवर्षी श्रावण महिन्यात हरिद्वारच्या कंखल येथे दक्षेश्वराच्या रूपात राहतात आणि संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे.
हेही वाचा :
Shravan 2025 Lucky Zodiac Sign: श्रावणात 'या' 5 राशींचा रक्षणकर्ता स्वत: भगवान शिव असतील! संकट आसपासही येऊ देणार नाहीत, भाग्यशाली राशी जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)