Shravan 2025: श्रावण सुरू होतोय, चुकूनही महादेवाला 'ही' फुलं, फळं आणि 'या' वस्तू अर्पण करू नका, पापाचे व्हाल धनी..

Shravan 2025: धार्मिक मान्यतेनुसार, आज आम्ही तुम्हाला अशी फुले, फळे आणि पूजा वस्तूंबद्दल सांगणार आहोत, जे चुकूनही शिव किंवा शिवलिंगाला अर्पण करू नयेत.

Continues below advertisement

Shravan 2025: शिवभक्त ज्या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. तो महिना म्हणजे श्रावण महिना अवघ्या काही दिवसातच सुरू होतोय, हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे, या काळात त्यांना काही खास वस्तू अर्पण करणे शुभ आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आज आम्ही तुम्हाला अशी फुले, फळे आणि पूजा वस्तूंबद्दल सांगणार आहोत, जे चुकूनही शिव किंवा शिवलिंगाला अर्पण करू नयेत. अन्यथा, पुण्य मिळण्याऐवजी साधकाला पाप माथी लागते.

Continues below advertisement

'या' गोष्टी चुकूनही भगवान शिवाला अर्पण करू नयेत..

तसं पाहायला गेलं तर, शिवभक्तांसाठी श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, 2025 मध्ये श्रावण महिना 25 जुलै ते 23 ऑगस्ट असा असेल. या काळात एकूण 4 सोमवार असतील. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी, भक्त श्रावण महिन्यात उपवास करतात आणि त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करतात. असे मानले जाते की जर भक्तांनी श्रावणात खऱ्या मनाने भगवान शिवाची पूजा केली तर त्याच्या इच्छा निश्चितच पूर्ण होतात. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही भगवान शिवाला अर्पण करू नयेत. अन्यथा, व्यक्ती पापाची धनी होते, आणि त्रास वाढू लागतो. जाणून घेऊया ती फुले, फळे आणि पूजा वस्तूंबद्दल, जे भगवान शिव आणि शिवलिंगाला अर्पण करण्यास मनाई आहे.

श्रावणी सोमवार कधी आहेत?

पहिला सोमवार 28 जुलै 2025
दुसरा सोमवार 4 ऑगस्ट 2025
तिसरा सोमवार 11 ऑगस्ट 2025
चौथा सोमवार 18 ऑगस्ट 2025

भगवान शिवाला कोणती फुले अर्पण करू नयेत?

केतकी
कमळ
कंटकारी
केवडा
चंपा
वैजयंती
मदन्ती
जुई
कैथ
कदंब
बहेडा
शिरीष
डाळिंब
लाल फुले

भगवान शिवाला कोणती फळे अर्पण करू नयेत?

नारळ
केळी
डाळिंब
संत्र
सफरचंद
नाशपती
जामुन
लिची
द्राक्षे
फणस

भगवान शिवाला कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत?

हळद
तुळशीचे पान
शंख
शंखाने जलाभिषेक
नारळाचे पाणी
कुंकु
तीळ
तुटलेला तांदूळ
उकळलेले दूध

हेही वाचा :                          

Weekly Horoscope: आजपासून जुलैचा नवा आठवडा सुरू! आठवड्याच्या सुरूवातीलाच 'या' 5 राशींनी मोठ्या सरप्राईझसाठी सज्ज व्हा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola