Astrology Panchang Yog 21 April 2025: आज 21 एप्रिल म्हणजेच सोमवारचा दिवस आहे. आजच्या दिवशी एक अतिशय चांगला योगायोग घडला आहे. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची कामिका एकादशी आहे. आज सोमवार आणि एकादशीचा संयोग एक अत्यंत दुर्मिळ योग निर्माण करत आहे.  आज चंद्र वृषभ राशीत असल्याने आणि गौरी योग बनल्याने देखील शुभ दिवस राहणार आहे. ज्यामुळे आज भगवान शिव आणि भगवान विष्णू दोघांचीही एकत्रित कृपा असेल. तसेच, आज रोहिणी नक्षत्रात वृद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा संयोग आहे, ज्यामुळे भगवान शिव आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने, तूळ राशीसह 5 राशींसाठी दिवस भाग्यवान राहणार आहे आजच्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 5 राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशींना कोणता लाभ मिळेल आणि या भाग्यशाली राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे. भोलेनाथांच्या आशीर्वादाने, तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, वैवाहिक जीवन आनंदी राहील. पैसे कमविण्यात यशस्वी व्हाल. तुमचा आदर वाढेल. नोकरदारांसाठी उद्याचा दिवस अनुकूल राहणार आहे. नवीन योजनांवर काम करण्याचे धाडस असेल आणि प्रत्येक परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची लवचिकता देखील असेल. विशेष म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चमक वेगळ्या पद्धतीने दिसून येईल. आज लोक तुमच्याकडून सल्ला घेण्यास येतील. तुमच्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी असेल. 

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस अतिरिक्त नफा मिळविण्याचा दिवस आहे. करिअर किंवा व्यवसायाच्या बाबतीत परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर आज तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. उद्या तुम्हाला जवळच्या मित्रांचा पाठिंबा मिळू शकतो. पैसे कमविण्याच्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकते. आजचा दिवस शुभ असू शकतो. आज तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. आज तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या जोडीदारासोबतच्या संबंधांमध्ये गोडवा येईल.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ दिवस असणार आहे. नियोजित काम पूर्ण होईल. अतिरिक्त फायदे मिळू शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. आज तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. विशेषतः तुम्ही नवीन दृष्टिकोनांना स्थान द्याल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले फायदे मिळू शकतात. तुमचे वर्तुळ विस्तारेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी उद्याचा दिवस चांगला राहणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस खूप खास असणार आहे. हवे असलेले काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. नोकरीत बदलीसाठी प्रयत्न करत असाल तर उद्या तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. ज्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. यासोबतच, तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमच्या यशाची शक्यता देखील वाढेल. कुटुंबातील वातावरण अनुकूल असेल. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येऊ शकतो. नात्यात गोडवा राहील.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी अपेक्षेपेक्षा चांगला दिवस जाणार आहे. आज पैसे कमविण्याच्या संधी मिळू शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट आणि वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्यांसाठी आशेचा किरण घेऊन येऊ शकतो. मानसिकदृष्ट्या खूप मजबूत वाटेल. कुटुंबात तुमच्या आईचा पाठिंबा आणि प्रेम मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच, कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध गोड असतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याची योजना आखू शकता. प्रेम संबंधांच्या बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहणार आहे.

हेही वाचा :           

Lord Shiv: देवांचे देव 'महादेव'! 'या' 4 राशींचं नशीब थोर, मोठ्या संकटापासून अलगद काढतात परमेश्वर, मृत्यूही काहीच वाकडं करत नाही

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)