Shravan 2024 : जुलै महिना जसजसा सरत चालला आहे तसतसे सणवार सुरु व्हायला सुरुवात झाली आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथात देखील अनेक मोठ्या आनंदात, उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मग्रंथांत या सणांना (Festivals) विशेष महत्त्व आहे. यामध्ये सर्वांमध्ये श्रावण (Shravan 2024) हा सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो. सगळेचजण श्रावणाची अगदी आतुरतेने वाट पाहतात. दरम्यान, उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर, महाराष्ट्रात श्रावण नेमका कधी? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 


भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे. त्यामुळेच या महिन्याचं महत्त्व फार आहे. अत्यंत पवित्र असा हा महिना जामानला तो. श्रावणात अनेक देवी-दैवतांची पूजा केली जाते. हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्या कारणाने अनेक व्रत-वैकल्ये, उपवास केले जातात. असं म्हणतात की, भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास आपल्यावर शंकराची विशेष कृपा राहते. 


उत्तर भारतात श्रावणाला सुरुवात 


उत्तर भारतात 22 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर, महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार 05 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण महिना सुरु होणार आहे. यावेळी 5 श्रावणी सोमवार येणार आहेत. 


महाराष्ट्रात श्रावण कधीपासून?


2024 या वर्षाचा श्रावण महिना येत्या ऑगस्टपासून सुरु होणार आहे. 5 ऑगस्टला श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर, 3 सप्टेंबर 2024 ला श्रावण अमावस्येला या तिथीची समाप्ती होणार आहे. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार यंदाच्या श्रावणात 5 श्रावणी सोमवार येणार आहेत. 


श्रावण महिन्याचं महत्त्व 


हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात मंगळागौर पूजन, नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा यांसारखे सण-उत्सव साजरे केले जात असल्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व आहे. तसेच, या महिन्यात भगवान शंकराच्या उपासनेला महत्त्व आहे. याशिवाय काही सण आहेत जे आपल्या पर्यावरणाचा विचार करुन त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारेही सण याच महिन्यात असतात त्यामुळे या महिन्याचं महत्त्व आणखी वाढतं. 


यंदाच्या श्रावणात एकूण 5 श्रावणी सोमवार


पहिला श्रावणी सोमवार - 5 ऑगस्ट 2024


दुसरा श्रावणी सोमवार - 12 ऑगस्ट 2024


तिसरा श्रावणी सोमवार - 19 ऑगस्ट 2024


चौथा श्रावणी सोमवार - 26 ऑगस्ट 2024


पाचवा श्रावणी सोमवार - 03 सप्टेंबर 2024 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Shravan 2024 : उत्तर भारतीयांचा आज पहिला श्रावण सोमवार; महाराष्ट्रात श्रावण कधी? भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर 'या' गोष्टी अर्पण करा