Shravan Somvar : हिंदू धर्मात श्रावण (Shravan 2024) महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यात यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून झाली, तसाच श्रावणाचा शेवटही सोमवारी होत आहे, याचा विशेष फायदा काही राशींना होणार आहे. यानंतर यंदा तब्बल 90 वर्षांनंतर शेवटच्या श्रावणी सोमवारी अनेक दुर्मिळ योग बनत आहेत.


श्रावणाच्या शेवटच्या सोमवारला विशेष महत्त्व असतं, यंदा या दिवशी शोभन योग, रवि योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. याचा विशेष लाभ मेष राशीसह 3 राशींना होणार आहे, या राशींवर महावादेवाची कृपा राहील. या राशींच्या जीवनाला कलाटणी मिळेल, परंतु या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांना श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बनत असलेल्या दुर्मिळ योगांचा विशेष लाभ होणार आहे. या दिवसापासून तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल. पैशाशी संबंधित अडचणींपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. शिवशंकराच्या कृपेने करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. श्रावणात शंकराची कृपा दुपटीने लाभू शकते. तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील. तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात. 


कर्क रास (Cancer)


श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार कर्क राशीसाठीही खूप शुभ मानला जातो. कारण या दुर्मिळ योगांच्या शुभ प्रभावाने तुमच्या जीवनात आनंद येईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकतं.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी श्रावणचा शेवटचा सोमवार शुभ राहील. विशेषतः वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील आणि परस्पर प्रेम वाढेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम मिळतील आणि तुम्हाला यश मिळेल. या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. प्रेम संबंध चांगले राहतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


September Lucky Zodiacs : सप्टेंबर महिना मेषसह 5 राशींसाठी ठरणार खास; लक्ष्मी योगामुळे नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार