Shravan 2024 : श्रावण (Shravan 2024) महिन्यात अनेक व्रत वैकल्य असतात. यंदा श्रावणात 5 सोमवार असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. यातच आता श्रावण महिन्याची सांगता होत आहे. आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला शिवमूठ (Shiva Muth) वाहिली जाते. प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवमूठ महादेवाला अर्पण केली जाते. त्यानुसार आज 2 सप्टेंबरला आलेल्या पाचव्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी? जाणून घेऊया.
पाचव्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ? (Shravan 2024 Fifth Shiva Muth)
श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामूठ वाहली जाते, त्याप्रमाणे शंकराला पाचव्या श्रावणी सोमवारी हरभऱ्याची (Gram Shiva Muth) शिवामूठ वाहायची आहे.
शंकराची पूजा कशी करावी?
श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल, दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.
प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शंकराच्या फोटोची पूजा करावी. शंकराचा फोटोसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी. ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकता.
शिवामूठ व्रत करण्याची पद्धत
विवाहानंतर पहिली पाच वर्षं श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्या चार/पाच सोमवारी चार/पाच प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं. विवाहानंतरची पहिली पाच वर्षं क्रमवार हे व्रत केलं जातं.
बेलपत्राचा धनवृद्धीसाठी 'असा' करा उपयोग
श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहण्याआधी बेलपत्राच्या तिन्ही पानांवर 'ओम नम: शिवाय' लिहा. तसेच, हा शिवमंत्राचा 11 वेळा जप करा. त्यानंतर हे पान उचलून घराच्या तिजोरीजवळ न्या. तसेच, पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत तो आकडा मनात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला सध्या मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा थोड्या अधिक रकमेचा विचार करावा. जास्त अपेक्षा केल्यास तुमचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. यासाठी पुढच्या श्रावणापर्यंत तुमच्या तिजोरीत किती रक्कम जमा होऊ शकते अशी प्रार्थना करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: