Shravan 2023 : उत्तर भारतात श्रावण 4 जुलैपासून सुरु झाला आहे आणि आज पहिला श्रावणी (Shravan 2023) सोमवार आहे. अर्थात, भारतात श्रावण 18 जुलैपासून सुरु होतोय. मात्र, उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाला आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार, श्रावण महिन्यात जो भक्त शंकराची खरी भक्ती करतो त्याचे सर्व संकट, अडथळे, दु:ख, वेदना दूर होतात. या दिवशी महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. या अत्यंत पवित्र आणि शुभ महिन्यात पहाटेपासूनच मंदिरात सर्व भाविकांची गर्दी पाहायला मिळते. शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रावणात नेमके काय करावे ते जाणून घेऊयात.


श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आणि या महिन्याभरात शिवलिंगावर काही खास गोष्टी अर्पण केल्याने शंकर भगवान प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. 


बिल्वपत्र : हे शंकराला विशेष प्रिय आहे. याला अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


दूध : शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्याबरोबरच शारीरिक शक्तीही वाढते. 


भांग : थंडई प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटली जाते. शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा अंत होतो आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. 


मध : शिवलिंगावर मध अर्पण केल्याने जीवनात आणि वाणीत गोडवा राहतो.


केशर : शिवलिंगावर केशरयुक्त दूध किंवा पाणी अर्पण केल्याने चेहऱ्यावर तेज आणि सौंदर्य येते. 


पाणी : केवळ इतर सर्व वस्तू अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात असे नाही. पूर्ण भक्तीभावाने शिवलिंग स्वच्छ आणि शुद्ध करून पाणी अर्पण केले तरी ते स्वीकारले जाते.  शिवलिंगावर *ॐ नमः शिवाय' या मंत्राच्या जपाने अर्पण करावे. ज्यामुळे मानसिक शांती आणि सर्वांशी स्नेहपूर्ण वागणूक मिळेल. 


चंदन : शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने समाजजीवनात मान-सन्मान वाढतो.


दही : शिवलिंगावर दही अर्पण केल्याने शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे मानतात. सुख-समृद्धीमुळे कामात यशाचा मार्ग मोकळा होतो. 


अत्तर : शिवलिंगावर अत्तर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. अत्तर अर्पण केल्याने मानसिक शांतीबरोबरच सर्व वाईट विचार नाहीसे होतात. 


तूप : शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने व्यक्तीची शारीरिक क्षमता वाढते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Horoscope Today 10 July 2023 : आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य