Shiv Puja : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देव किंवा देवतेला समर्पित आहे. त्यानुसार, महादेव म्हणजेच भोलेनाथांना सोमवारचा दिवस समर्पित आहे. या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याचीही पद्धत आहे. उपवास नाही धरला तरी या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. भोलेनाथांची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि तिच्यावर सुख-समृद्धीचा वर्षाव होतो.


सोमवारी तु्म्ही शंकराच्या (Lord Shiva) मंदिरात जाऊन शिवलिंगावर (Shivling) जल अर्पण करू शकता. शिवलिंगाला जल अर्पण केल्याने भगवान शंकर खूप प्रसन्न होतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात, असं मानलं जातं.  पण आता प्रश्न पडतो की शिवलिंगावर जल अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती? सहसा आपण जल घेऊन ते शिवलिंगाच्या मस्तकाला अर्पण करतो आणि शिव मंत्राचा जप करतो. पण तुम्हाला माहित आहे का की, कधी कधी तुम्ही चुकीच्या पद्धतीने शिवलिंगाला जल अर्पण करता?


शिवलिंगाला जल अर्पण करण्याच्या 5 पद्धती


शिवपुराणानुसार, भगवान शंकराला योग्य पद्धतीने जल अर्पण केल्यास तो कधीही तुमच्यावर कोपत नाहीत. तुम्ही 5 पद्धतीत भगवान शंकराला जल अर्पण करू शकता. शिवपुराणानुसार, पंचामृत ज्या प्रकारे दूध, दही, ड्रायफ्रुट्स, तूप आणि मध या पाच गोष्टींनी बनलेलं आहे. तसेच शिवाला जल अर्पण करण्याचे पाच प्रकार सांगितले जातात. या पाच प्रकारे जल अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि सर्व दु:ख दूर करतात.


शिवलिंगाला जल अर्पण करण्याची पहिली पद्धत


एका तांब्यात पाणी घ्या आणि हळूहळू शिवलिंगाच्या डोक्यावरुन पाणी अर्पण करा, ही शिवलिंगाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आहे, ज्याने भोलेनाथ खुश होतात.


शिवलिंगाला जल अर्पण करण्याची दुसरी पद्धत


उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगाला पाणी अर्पण करा. उत्तर दिशेला जलाहरी आहे. या दिशेला पाणी अर्पण केल्याने रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते.


शिवलिंगाला जल अर्पण करण्याची तिसरी पद्धत


अशोक सुंदरीच्या स्थानापासून जल अर्पण करून शिवलिंगाच्या मस्तकापर्यंत वर न्यावं. असं केल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि कुटुंबात सुख-शांती नांदेल.


शिवलिंगाला जल अर्पण करण्याची चौथी पद्धत


तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी पाण्याचा तांब्या घ्या. सर्वप्रथम गणेशजी, कार्तिकेय जी, अशोक सुंदरी, जलधारी यांना जल अर्पण करा आणि त्यानंतर ते शिवलिंगावर पूर्णपणे फिरवा आणि नंतर डोक्याला अर्पण करा.


शिवलिंगाला जल अर्पण करण्याची पाचवी पद्धत


शंकराच्या शिवलिंगाला वरुन खालपर्यंत जल अर्पण करावे, असं केल्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Astrology : तब्बल 12 वर्षांनंतर सूर्य आणि गुरुची युती; 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नवीन नोकरीसोबत व्यवसायात होणार प्रगती