Shiv Mahapuran: निसर्गाचा नियमच आहे, जो जन्माला येतो, त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि हे शाश्वत सत्य आहे. जो कोणी या पृथ्वीतलावर जन्माला येईल, त्याचा अंत निश्चित आहे. मृत्यू टाळता येत नाही, पण काही संकेताव्दारे तो ओळखता मात्र येऊ शकतो. गरुड पुराण आणि शिव महापुराण इत्यादी अनेक धर्मग्रंथांमध्ये अशा काही लक्षणांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्या माणसाला मृत्यूपूर्वी जाणवतात. शिव महापुराणात मृत्यूपूर्वी माणसाला कोणती लक्षणं दिसतात त्याबद्दल सांगण्यात आले आहे. शिव महापुराणानुसार, भगवान शिवाने स्वत: माता पार्वतीला अशा काही लक्षणांबद्दल सांगितले होते, ज्यावरून हे समजू शकते की, मृत्यूची वेळ जवळ आली आहे.


मृत्यू येण्यापूर्वी दिसतात हे 7 संकेत!


शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्याला काही संकेत दिसू लागतात. यावरून आपण अंदाज लावू शकतो की, त्याचा मृत्यू जवळ आला आहे.


शिव महापुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे शरीर निळे पडू लागते. 6 महिन्यांपूर्वी त्याच्या शरीरावर लाल खुणा दिसू लागतात.


जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूच्या जवळ असते, तेव्हा त्याच्या शरीरातील काही भाग काम करणे थांबवतात. अशा व्यक्तीचे तोंड, कान, डोळे आणि जीभ नीट काम करत नाहीत. याचा अर्थ त्या व्यक्तीकडे आता फक्त 6 महिने शिल्लक आहेत.


जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत थरथरत असेल आणि तोंडाच्या आतला टाळू कोरडा होऊ लागला तर याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला जगण्यासाठी फक्त 1 महिना शिल्लक आहे.


जेव्हा मृत्यू जवळ येतो, तेव्हा माणूस पाणी, तेल, तूप किंवा आरशात त्याचे प्रतिबिंब पाहणे थांबवतो. शिव महापुराणानुसार जेव्हा सावली दिसणे थांबते तेव्हा त्या व्यक्तीकडे कमी वेळ आहे असे समजावे.


शिव महापुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा चंद्र आणि तारे स्पष्टपणे दिसणे बंद होतात. असे झाल्यावर त्या व्यक्तीकडे कमी वेळ शिल्लक आहे हे मान्य केले पाहिजे.


मृत्यूच्या 3 ते 4 दिवस आधी, एखाद्या व्यक्तीला त्याच्या भोवती त्याच्या पूर्वजांची उपस्थिती जाणवू लागते. त्याच्या आजूबाजूला कोणीतरी आहे असे त्याला वाटते.
एखाद्या व्यक्तीला पाहून कुत्रे रडू लागले तर समजा त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)