Shani Vakri Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Shani Dev) 13 जुलै रोजी मीन राशीत वक्री होणार आहे. सध्या शनी मीन राशीत 29 मार्चपासून संक्रमण करतोय तर 13 जुलै रोजी मीन राशीत शनी वक्री होणार आहे. या दरम्यान 139 दिवस उलटी चाल चालल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी शनी मीन राशीत पुन्हा मार्गी होणार आहे. त्यामुळे या दरम्यान अनेक राशींच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. या दरम्यान शनीच्या वक्री चालीचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या बाराव्या चरणात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात अनेक प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. या काळात तुमच्या खर्चात देखील वाढ होऊ शकते. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत गंभीर असणं गरजेचं आहे. कारण या काळात तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक समस्या उद्भवू शकतात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या दहाव्या चरणात शनीची वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला चांगली प्रसिद्धी मिळेल. मात्र, याचा जास्त गर्व करु नका. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. या दरम्यान मेहनतीला पर्याय नाही. त्यामुळे मेहनत करत राहा. फक्त फळाची अपेक्षा करु नका.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या सातव्या चरणात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात सामंजस्याने व्यवहार करा. तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर तुमचे वादविवाद होऊ शकतात. अशा वेळी घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या सहाव्या चरणात शनी वक्री होणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. मात्र, कामाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असेल. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे विनाकारण कोणत्याही गोष्टीवरुन वाद होऊ शकतात.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या सहाव्या चरणात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे तुम्हाला यशाचे अनेक मार्ग सापडतील. चांगली प्रसिद्धी मिळेल. मात्र, या दरम्यान तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा परिणाम दिसेल. तसेच, आर्थिक बाबतीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)