IPL 2025 Winner: आयपीएल 2025 चा अंतिम सामना 4 जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीनं (RCB) 18 वर्षांचा दुष्काळ संपवत ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर मैदानात विराट कोहलीला रडू कोसळलं. सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्येच मैदनात विराट ढसाढसा रडू लागला. लाडक्या विराटला रडताना पाहून चाहत्यांनाही रडू कोसळलं. पण, विराटच्या डोळ्यांतली आसवं, आनंदाश्रू होते. अठरा वर्ष ज्या स्वप्नानं पछाडलं होतं, ते स्वप्न अखेर पूर्ण झालं होतं. फायनचा सामना पाहण्यासाठी अनुष्का उपस्थित होती. आरसीबीच्या विजयानंतर अनुष्काच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
पहिल्यांदा आयपीएलचं टायटल जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. सामना संपल्यानंतर पत्नी अनुष्का विराटला भेटला. विराटनं थेट अनुष्काला मिठी मारली. अनुष्का शर्माला मिठी मारल्यानंतर तो खूप रडला, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच वेळी अनुष्का शर्मानंही तिच्या पतीच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. अनुष्कानं थेट विराटला कडकडून मिठी मारली.
अठरा वर्षांत पहिल्यांदाच RCB नं उंचावली ट्रॉफी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन बनली आहे. आरसीबीनं आयपीएल 2025 च्या फायनल सामन्यात पंजाब किंग्सला 6 धावांनी मात दिली. आरसीबीनं पहिल्यांदा मैदानावर उतरत 190 धावा केल्या होत्या आणि आरसीबीनं दिलेलं आव्हान स्विकारत पंजाबचा संघ मैदानात उतरला होता. पण, पंजाबला ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यासाठी 184 धावाच केल्या.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया काय?
आरसीबीनं आयपीएल ट्रॉफी जिंकताच, विराट कोहली अनुष्का शर्माकडे धावला. एका चाहत्यानं त्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिलंय की, 'तिनं जे काही अनुभवलंय, त्यासाठी वाट पाहणं सार्थक होतं.'
सामन्यादरम्यान अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये आरसीबीला चिअर करताना दिसली. ती आरसीबीचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सचं नाव घेत असल्याचंही दिसलं. एका चाहत्यानं स्टेडियममधून तिचा व्हिडीओ शेअर केला आणि इंस्टाग्रामवर लिहिलंय की, 'अनुष्का शर्मा प्रेक्षकांसोबत आरसीबीला चिअर करताना आणि म्हणत आहे की, एबीडी हा सामन्यातील सर्वात गोंडस क्षण होता.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :