Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) हा न्यायदेवता आहे. तसेच, नवग्रहांच्या तुमलेने सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीला (Lord Shani) एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर, संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तीस वर्षांचा कालावधी लागतो. शनी 2025 मध्ये आपल्या मूळ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे.
त्याचबरोबर, 13 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजून 36 मिनिटांनी शनी वक्री होणार आहे. या दरम्यान शनी तब्बल 138 दिवसांपर्यंत वक्री अवस्थेत असणार आहे. शनीच्या उलट्या चालीने तीन राशींच्या लोकांवर शनीची कृपा राहील. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनीचं मीन राशीत वक्री होणं कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरु शकते. शनी या राशीच्या नवव्या चरणात वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच,या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. हा काळ तुमच्या कुटुंबियांबरोबर चांगला जाईल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. शेअर मार्केटमध्ये तुम्ही चांगली गुंतवणूक करु शकता.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लग्न भावात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या आयुष्यात सुख-शांती टिकून राहील. तसेच, तुमचं मन धार्मिक कार्यात जास्त गुंतेल. पण तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
या राशीच्या एकादश चरणात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप लाभ मिळू शकतो. तुमच्या जीवनात सुख-शांती आणि समाधान राहील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा आहे. उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला अचानक धनलाभगी होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :