Shani Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वाचं स्थान आहे. 30 जून रोजी शनिदेव (Shani Dev) कुंभ राशीत वक्री झाला आहे. शनि जेव्हा वक्री होतो, म्हणजेच उलटी चाल चालतो, त्यावेळी अनेक राशींच्या अडचणी वाढतात, त्यांचा अडचणीचा काळ सुरू होतो. यामुळे शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय केले पाहिजे. कुंभ राशीत 15 नोव्हेंबरपर्यंत शनि उलटी चाल चालेल.


असं मानलं जातं की, शनि वक्रीच्या काळात दानधर्म केल्याने शनि पिडा दूर होते, सर्व अडचणी दूर होतात. शनि वक्री असेल तेव्हा राशीनुसार कोणत्या गोष्टींचं दान करावं? जाणून घेऊया.


शनि पिडा दूर करण्यासाठी राशीनुसार करा दान


मेष - जेव्हा शनि वक्री होतो तेव्हा मेष राशीच्या लोकांनी तीळ, हरभरा, तूप आणि बेलाच्या पानांचं दान करावं. हे दान शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यास उपयुक्त आहे.


वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी सोनं, पिवळे वस्त्र, तूप आणि दूध दान करावं. यामुळे शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो.


मिथुन - मिथुन राशीच्या लोकांनी हिरवा कापूर, तूप, पिवळी फुलं आणि मध दान करावं. हे दान केल्याने मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारते.


कर्क - कर्क राशीच्या लोकांनी या काळात मोहरीचं तेल, तूप, पांढरे वस्त्र आणि दही दान करावे. यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि कौटुंबिक आनंद वाढतो.


सिंह - सिंह राशीच्या लोकांनी पितळेची भांडी, आले, गूळ आणि साखर दान करावी. हे दान केल्याने त्यांना व्यवसाय आणि कार्यात यश मिळतं.


कन्या - कन्या राशीच्या लोकांनी तांदूळ, मूग डाळ, मोहरीचं तेल आणि दही दान करावं. हे दान केल्याने शिक्षण, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती सुधारते.


तूळ - तूळ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र, मध, सुंठ, गूळ यांचं दान करावं. या देणगीमुळे त्यांचं सामाजिक  क्षेत्रातील यश वाढतं.


वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी शनीची वक्रदृष्टी असताना लवंग, खीर, तीळ आणि मध यांचं दान करावं. यामुळे त्यांची धार्मिक आणि आध्यात्मिक बाजू मजबूत होते.


धनु - धनु राशीच्या लोकांनी या काळात देशी गाईचं तूप, साखर, हरभरा आणि गूळ यांचं दान करावं. या दानामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते.


मकर - मकर राशीच्या लोकांनी काळी उडीद डाळ, तीळ, लवंग आणि मध दान करावं. या दानामुळे त्यांची करिअरमध्ये प्रगती होते.


कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी या काळात तूप, गूळ आणि मध यांचं दान करावं. या दानामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहतं.


मीन - मीन राशीच्या लोकांनी शनीच्या वक्री चरणात तांदूळ, तूप, पिवळी फुलं आणि खीर यांचं दान करावे. या दानामुळे त्यांचा समाजातील आदर वाढतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani Dev : शनीची उलटी चाल 'या' राशींवर पडणार भारी; प्रत्येक कामात येणार अडथळे, जोडीदारासोबत उडतील खटके