Shani Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani) आणि शनीच्या स्थितीला विशेष महत्त्व दिलं जातं. शनिदेवाला न्याय देवता म्हटलं जातं, तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. जेव्हा जेव्हा शनि एखाद्या राशीत वक्री होतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या शनि कुंभ राशीत विराजमान असून 30 जूनला याच राशीत शनि वक्री (Shani Vakri) होईल. शनीची ही स्थिती 15 नोव्हेंबरपर्यंत कायम राहील.
शनीच्या वक्री (Shani Vakri 2024) स्थितीमुळे काही राशीच्या लोकांना शुभ, तर काहींना अशुभ परिणाम पाहायला मिळतील. तूळ राशीसह 3 राशींच्या लोकांसाठी शनि वक्री शुभ ठरेल. या राशींना या काळात अनेक सुखसोयी प्राप्त होतील. त्यांची आर्थिक स्थिती चांगली होईल, अनपेक्षित धनलाभाच्या संधी प्राप्त होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. शनि वक्री काळात 3 राशींच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
शनि वक्री काळ 'या' राशींसाठी भाग्याचा
तूळ रास (Libra)
येत्या 5 महिन्यांत तूळ राशीच्या लोकांसाठी शनीची चाल लाभदायक ठरू शकते. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळेल. समाजात तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. त्याच वेळी, या कालावधीत तुमच्यासाठी अनेक नवीन गुंतवणूक पर्याय उपलब्ध होऊ शकतात.
वृश्चिक रास (Scorpio)
पुढील 5 महिने कुंभ राशीत असलेला शनि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना अनेक चांगले गुंतवणूकदार मिळू शकतात. लव्ह लाईफमध्ये काही चढ-उतार येतील, जे बोलून सोडवता येतील. तुम्हाला अनेक नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनि येत्या 5 महिन्यांत काही चांगली बातमी घेऊन येईल. या काळात तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. तब्येतीत काही चढ-उतार पाहायला मिळतील, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनाही काही चांगली बातमी मिळू शकते. त्याच वेळी, तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी फिरायला देखील जाऊ शकता. शनीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :