Shani Vakri 2024 : शनीला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. शनि हा सर्वात क्रूर ग्रह देखील मानला जातो. कारण शनि माणसाला चुकांची शिक्षा देताना मागे-पुढे पाहत नाही, कुणावरही दया करत नाही. शनि (Shani) हा सूर्यमालेतील सर्वात हळू चालणारा ग्रह आहे, त्यामुळे व्यक्तीवर त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो.
139 दिवस चालणार उलटी चाल
जेव्हा जेव्हा शनिदेव आपली चाल बदलतो, तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. सध्या कुंभ राशीमध्ये शनि उलट्या चालीत फिरत आहे. 30 जून रोजी शनि (Shani) कुंभ राशीत वक्री झाला आहे. आता शनिदेव या राशीत 139 दिवस उलटी चाल चालेल. यानंतर 15 नोव्हेंबर 2024 रोजी कुंभ राशीत शनि मार्गी (Shani Margi 2024) होईल.
शनि वक्री स्थिती असताना अत्यंत कडक असतो,असं म्हणतात. काही राशींसाठी हा काळ शुभ ठरतो, तर अनेक राशींसाठी हा काळ अत्यंत त्रासदायक ठरतो. शनि वक्रीमुळे कोणत्या राशींचे 139 दिवस कठीण काळाचे असणार? जाणून घेऊया.
शनि वक्री 'या' राशींवर पडणार भारी
मकर रास (Capricorn)
शनीच्या उलट्या चालीचा नकारात्मक प्रभाव मकर राशीच्या लोकांच्या जीवनावर पडेल. या काळात तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या मिळतील, त्या जबाबदाऱ्या पेलणं तुमच्यासाठी पुढे धोकादायक ठरू शकतं. शनीच्या वक्रीमुळे या राशीच्या लोकांनी मोठ्या व्यवहारादरम्यान सावध राहावं. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जागरूक असलं पाहिजं. या काळात, अभ्यास, मुलाखती इत्यादी कोणत्याही कामासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल.
कुंभ रास (Aquarius)
शनि तुमच्या राशीतच वक्री आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, आपण यावेळी कोणतंही नवीन किंवा महत्त्वाचं काम सुरू करणं टाळावं. वादविवादासारख्या प्रसंगापासून दूर राहावं. घरी आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल.
मीन रास (Pisces)
या राशीच्या लोकांना शनि वक्री काळात म्हणजेच, 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व काही काळजीपूर्वक करावं लागेल, अन्यथा छोटीशी चूकही मोठं नुकसान करू शकते. कारण शनीच्या उलट चालीमुळे मीन राशीच्या लोकांना नशिबाची फारशी साथ मिळणार नाही. या काळात तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल, उत्पन्नापेक्षा जास्त खर्चाची परिस्थिती निर्माण होईल आणि आरोग्याशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :